0
खाकरा खाऊन झाली विषबाधा अन्न व औषध प्रशासनाकडे मागणार न्याय : अभिजित पाटील.

पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील नवीन पनवेल शहर येथे असलेल्या डी-मार्ट  (अॅव्हेन्यू सुपरमार्ट) शॉपमध्ये एका चिमुरड्याला मुदत संपलेला जैने एक्स नामक कंपनीचा खाकरा खाऊन विषबाधा झाली. यामुळे कु. रिदम कोले (वय ५ वर्षे, रा. पनवेल) याला उलट्या व जुलाबाच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. यासंदर्भात त्याच्या नातेवाईकानी डी-मार्ट  येथे जाऊन व्यवस्थापनाला याबाबत विचारणा केली मात्र यावेळी त्यांना उलटसुलट व उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे त्रासलेल्या नातेवाईकानी स्थानिक पत्रकार यांना बोलावून घेऊन यासंदर्भात आवाज उठवला व ठिकाणी चाललेल्या मुदत संपलेल्या विक्रीचा प्रकार लोकांसमोर उघडकीस आणला. नवीन पनवेल येथील  डी-मार्ट याठिकाणी मुदत संपलेली खाद्यपदार्थ, क्रीम, शॅम्पू आदींची होत असलेली विक्री जागरूक नागरिक अभिजित पाटील यांनी उघडकीस आणली. डी-मार्ट  या (अॅव्हेन्यू सुपरमार्ट) स्टोअरमध्ये ग्राहकांना मुदत संपलेला माल विकून स्वतः बक्कळ नफा कमविण्याचे काम इमाने इतबारे केले जात आहे.  या प्रकाराबाबत अभिजित पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन यांना पूर्ण माहिती देणार असून डी-मार्ट  मधील अशा वस्तूंवर कारवाई  करण्यात यावी अशी मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे लवकरच करणार आहेत.  डी-मार्ट  (अॅव्हेन्यू सुपरमार्ट) या स्टोअरमध्ये पनवेल तालुक्यातील अनेक ठिकाणांहून लोक खरेदीसाठी येत असतात. विविध ऑफर व सवलती देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम याठिकाणी केले जाते.पनवेल तालुक्यात अनेक खेडेगाव असून डी-मार्ट मध्ये कमी दरात सामान मिळत असल्याने याठिकाणी खेडेगावातील लोकांची कायम गर्दी असते मात्र याठिकाणी येणाऱ्या लोकांना मुदत संपलेल्या वस्तू विकण्यात येतात व याची बहुतांश लोकांना कल्पना नसते मात्र अशा वस्तू विकल्याने विविध आजार होऊन परिणामी एखाद्याचा मृत्यू देखील होऊ शकतो याची जाणीव डी-मार्ट व्यवस्थापनाला नाही असे दिसून येते.  मात्र ग्राहकांना मुदत संपलेला माल देऊन स्वतःचे गल्ले भरण्याचे काम याठिकाणी होत असून यामुळे अनेकदा मुदत संपलेले पदार्थ सेवन केल्याने व वापरल्याने विषबाधा, केस गळणे, ऍलर्जी यासारखे आजार सर्रास लोकांना होत आहेत व डी-मार्ट  व्यवस्थापन यामुळे नागरिकांची फसवणूक करीत आहेत याचा विचार अन्न व औषध प्रशासनाने करणे गरजचे आहे  व डी-मार्ट (अॅव्हेन्यू सुपरमार्ट) स्टोअरवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे असे मत अभिजित पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

डी-मार्ट (अॅव्हेन्यू सुपरमार्ट) स्टोअर करते कामगारांचे शोषण.
भारतरत्न  मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या कामाचे तास ८ तास केले होते. मात्र डी-मार्ट स्टोअरने कामगारांचे कामाचे तास ९ तास केले व त्या ९ तास कामगारांना १ तास ब्रेक दिला जातो.  डी-मार्ट व्यवस्थापनाला कोणी जाब विचारल्यावर ते सांगतात की आम्ही कुठे ९ तास काम करायला लावतोय ? कामगार तर ८ तासच काम करीत आहेत, आम्ही त्यांना १ तास ब्रेक देतो. डी-मार्ट व्यवस्थापनाची मुजोरी इतकी वाढली आहे कि त्यांनि कायदा आपल्याच खिश्यात आहे असे मनामध्ये पक्के केले आहे. भारतरत्न मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी कामगारांच्या काम करण्याच्या क्षमतेचा अभ्यास करुनच कामगारांच्या कामाचे तास ८ तास व (त्यातच लंच ब्रेक) केले होते.  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकराना हे पण माहितच होते की ८ तासाच्या ड्यूटी मध्ये  कामगाराना *जेवायला*(लंच ब्रेक) तर लागेलच. तो विचार करुनच भारतरत्न मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी कामगारांच्या कामाचे तास ८  केले होते. पण डी-मार्ट व्यवस्थापनाने स्व:ताचे नियम बनवून हम करेसो कायदा  असा  नियम *डी-मार्ट*  मधील स्टाफ आणि प्रोमोटरवर लादले आणि त्यांच्या  कामाचे तास ९ तास केले. डी-मार्ट ९ तासच काम करुन घेते अस ही नाही दर शनिवार व रविवार व सुट्टी च्या दिवशी (बँक हॉलिडे) १० ते ११  तास काम करुन घेतात.  ८ तासापेक्षा जास्त काम कामगारांकडून करुन घेणे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे असा गुन्हा डी-मार्ट स्टोर  नियमितपणे करत आहे तसेच हे एक मानवाधिकारांचे देखील उल्लघंन आहे, याबाबतही कडक कारवाई संबंधित प्रशासनामार्फत होणे गरजेचे आहे असे मत काही कामगारांनी पत्रकारांशी नाव न छापण्याच्या अटीवर यानिमित्ताने बोलताना व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top