0

अंजनगांव सूर्जी :- जयेंद्र गाडगे

आंदोलनकर्त्यांनी पाठ फिरवताच पारंपारीक काट्यावर मापाई
बाजार समितीत शेतकर्यांचे शोषण
साडेचार लाख रुपये खर्च करुन २५ अडत्याकरीता खरेदी केलेले ईलेक्ट्राँनीक वजन काटे नादूरुस्त असल्याचे कारण सांगुन पारंपारिक वजन काट्यावरच शेतकर्यांचा माल मोजल्या जात असल्याने बरेच दिवसापासून ईलेक्ट्राँनीक काट्यावर माल मोजण्याची मागणी होत होती असे असतांनाही बाजार समिती सचिव व संचालक  शेतकर्यांचा हीताकडे लक्ष देत नसल्याने अखेर दि.२८ ला.  प्रहारचे प्रदिप निमकाळे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी यशस्वि आंदोलन  केले होते. परंतु आंदोलन केल्या नंतरहि बाजार समिती उडवा उडविचे उत्तरे देत होती त्यामुळे बाजार समितीला बुधवार पर्यंतचा वेळ देऊण बुधवार पर्यंत ईलेक्टाँनिक काटे न बसविल्यास बाजार समिती बंद करण्याचे अँल्टिमेट दिले होते आज दिनांक 28फेब्रृवारीला बाजार समितीत जावूण प्रहारणे चौकशी केली तर इलेक्ट्रॉनिक काँटे बसविण्यात आले व या नंतर इलेक्ट्राॕनिक काट्यानवर शेतकऱ्याचा माल मोजण्यात येईल असे आश्वासन अडते , सचिव यांनी आंदोलनकर्यांना दिले मात्र आंदोलनकर्यांनी पाठ फिरवताच आडत्यांनी पून्हा पारंपारिक काट्यावरच शेतकऱ्यांचा माल मोजल्याने येथिल बाजार समिती अडते, व्यापारी शेतकऱ्यांचे शोषन करीत असल्याची चर्चा सूरू आहे.
 अंजनगांव सूर्जी बाजार समितीत गेल्या अनेक वर्षापासून ईलेक्ट्राँनीक काट्यावर शेतकर्यांचा मालाची मापाई करण्याची मागणी होत होती. त्यासाठी एक वर्षापुर्वी बाजार समितीला निवेदन सूद्धा दीले होते. बाजार समितीने ईलेक्ट्राँनीक २५ काटे विकत घेतले ज्यासाठी जवळपास चार ते साडेचार लाख रुपये खर्च केले परंतू  एक वर्षापासून शेतकर्यांची मागणी असून सूध्दा अडत्यांनी ईलेक्ट्राँनीक काटे लावले नाही. आता शेतकरी तूर , हरबरा , सोयाबिन हे पांरपारीक काट्यानवरच मोजले जात होते म्हणून प्रहारणे अनेक वेळा बाजार समितीत आंदोलन सुध्दा केले  होते .त्या मूळे आज दिंनाक २८ फ्रेब्रृवारीला उप तालुका प्रमुख ऋषीकेश वाघमारे यांच्या नेत्वात बाजार समितीत धाव घेवूण ईलेक्टाँनिक काटे बसविले की नाहि यांची चोकशी करुण बाजार समितीचे सचिव नवघरे यांनी खरेदिच्या ठीकाणी जावूण आढावा घेतला आज बाजार समिती जवळ जवळ 13इलेक्टाँनिक काटे बसविल्याचे दाखवूण दिले असुन उर्वरीत ईलेक्टाँनिक काटे येत्या आठ दिवसात बसविण्याचे आश्वासण दिले.व सभापती संजय रोहणकर सचिव नवघरे मापारी व अडते यांची आज बैठक घेवूण त्याना या नंतर माप ईलेक्टाँनिक काट्यानवर करण्याचे निर्देश दिले.परंतु आंदोलन संपताच पारंपरिक काट्यावर माप केल्याने अडते व व्यापारी  हे शेतकर्यांचे शोषन करीत असून आपले हित जोपासण्याचा प्रयत्न करित असल्याचे पून्हा सिध्द झिले झालेल्या आंदोलणात अरुण शेवाणे,अवि टांक राजु पडोळे.निखील कडू,रंजित ईगळे,शुभम निमकाळे.अनंत मते,अंकुश पाचघरे,सुजित काठोळे,विनोद वानखडे,अनिकेत ढोक,नितिन चोखडे,अमोल अढाऊ,अदि कार्यकर्ते उपस्थित होते.
तळोकार यांची दादागिरी
बाजार समितीतील ईलेक्टाँनिक काटे बसविण्याची चौकशी करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते आणि बाजार समितीचे सचिव , कर्मचारी गेले  असता  अडत चालक गणेश तळोकार व त्याच्या मुलाने गेलेल्या कार्यकर्ते व शेतकर्या सोबत हूज्जत घालूण मी माझ्या मताने काटा लावेन माझे कोणी काय करते अशी अरेरावी केल्याने प्रहारचे कार्यकर्ते व तळोकार यांच्यात बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .तर सर्व आडत्यांनी ईलेक्ट्राँनीक काटे न लावल्यास याही पेक्षा मोठे आंदोलन करण्याचा ईशारा प्रहारचे उप तालूका प्रमूख ऋषीकेश वाघमारे यांनी दिला .

टिप्पणी पोस्ट करा

 
Top