कल्याण(प्रतिनिधी) अनुसूचित जमातीचे कल्याण डोंबिवली महापालिका अधिकारी भागजी भांगरे यांनी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केल्याचा राग मनात धरून भांगरे यांचे अपहरण करून जातीवाचक शिवीगाळ ,शासकीय कामात हस्तक्षेप ,आणि दमदाटी केल्या बद्दल कल्याण डोंबिवली महापालिका विरोधी पक्ष नेता मंदार हळबे, बिजेपी नगरसेवक शैलेश धात्रक, यांच्यावर डोंबिवली येथील मानपाडा पोलीस स्टेशन मधी २८फेब्रुवारी रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कलाम3(१)(२),३(१)(१०) व भा. द. वि. कलम ३५९,३४१,३६३,३३२,१३६,५०९,५०६,३४ नुसार गुन्हे दाखल होऊन आज ८ दिवस उलटून गेले तरी अद्यापही मंदार हळबे, शैलेश धात्रक यांना अटक केली नाही.यांना त्वरित अटक करावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने आंबेडकर उद्यान,कल्याण येथे धरणे आंदोलन करून आरोपींना त्वरित अटक करावी अन्यथा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आशा आशयाचे निवेदन कल्याण तहसीलदार कार्यालयाला देण्यात आले यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरशिंग गायसमुद्रे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयपाल कांबळे ठाणे जिल्हा महिला सचिव उषा गंबरे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्षा अपेक्षा दळवी- वानखेडे, ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष हर्षदा भानुशाली आदींसह दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रसिद्धी प्रमुख
पत्रकार मिलिंद वानखेडे
8108460078

टिप्पणी पोस्ट करा