0

भंडारज ते जवर्डी व मुऱ्हा ते सातेगाव रस्त्याचे ना.प्रवीण पोटे पाटिल व आमदार रमेशभाऊ बुंदिले यांच्या हस्ते भूमिपूजन
_____________________________
अंजनगाव सुजिँ/ प्रतिनिधी महत्वाच्या रस्तानसाठी ६कोटि २४लक्ष निधी उपलब्ध
मुऱ्हा, सातेगाव, वरुडा, कालवाडा, धुळकी, जवर्डि, धनवाडी, भंडारज ई गावाना होणार फायदा
भंडारज ते जवर्डी करिता 1 कोटि 68 लक्ष निधी उपलब्ध
मुऱ्हा ते सातेगाव करिता 4 कोटि 60 लक्ष निधि उपलब्ध
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण मार्ग अतिशय बेकार असल्याने नागरिकांना दळणवळण करण्यासाठी व शेतामध्ये जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या.त्यामधील जास्तीत जास्त रस्ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीने भंडारज ते जवर्डी आणि मुऱ्हा ते सातेगाव रस्ता डांबरीकरण करणे या दोन रस्त्याचे भूमिपूजन मा.ना.श्री.प्रविण पोटे पाटील साहेब यांच्या शुभहस्ते आणि आमदार श्री.रमेशजी बुंदीले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
        ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था अतिशय बेकार आहे. सदरील रस्ते चांगल्या स्थितीत व्हावे यासाठी आमदार श्री.रमेशजी बुंदीले हे सतत प्रयत्न करीत असतात. मुख्यमंत्री ग्राम सडक योजणे अंतर्गत मंजूर करून भंडारज ते जवर्डी -१६७ लक्ष रुपये आणि मुऱ्हा ते सातेगाव-४६० लक्ष रुपये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. निधी मंजूर करून घेतला त्यामुळे सदरील रस्त्यावरील शेतकऱ्यांना व नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत. यामुळे भंडारज, धनवाडी, जवर्दी, धुळकी, सातेगाव, मुऱ्हा, कालवाडा, वरुड बु. इत्यादी गावांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.  आमदार श्री.रमेशजी बुंदीले यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी व शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
    भूमिपूजन उपस्थिती मध्ये तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर दाळू महाराज, जि.प.सदस्य विजयराव काळमेघ, नगराध्यक्ष कमलकांतजी लाडोळे, उपाध्यक्ष न.प.सतिश वानखडे, सभापती प्रियंकाताई दाळू, पं.स.सदस्य नितीन पटेल, केशवराव कळमकर, नंदूभाऊ काळे, शहराध्यक्ष मुन्नाभाऊ पटेल, महिला अध्यक्ष अर्चना ताई पखान, सरचिटणीस राजेंद्र रेखाते, भास्कर माकोडे, राजुभाऊ गीते, संतोष काळे, अभिषेक पटेल, विक्रम पाठक, पवार सर, मनिष पवार, शिवाजी पाटील गावंडे, गणेशराव गीते, पांडुरंगजी हुरबडे, सरपंच जयाताई सावळे, गोपाळ बाभुळकर, निलेश सुने, शिलताई सगणे, प्रविण टाले, गजेंद्र ढोक, सतिश मत्ते, जाकीर भाई, प्रभाकर डोबाळे, शेषराव बुंदीले, संतोषजी वर्मा, सरपंच चांदुभाऊ ढोले, सरपंच सीमाताई हाडोळे, उपसभापती महेश खारोळे, कपिल देशमुख, दिलीप निर्मळ, मनोजभाऊ कावरे, ता.युवा मोर्चा अध्यक्ष रवीभाऊ गोळे, रुपेश वडतकर, अतुल काळे, सुधीर गोळे, मुरलीधर केवटी, हरिचन्द्र गायगोले सर, संजयभाऊ हाडोळे, संतोष कावरे, प्रणय पखान, निवृत्ती सावरकर, अविनाश पवार, कार्यकारी अभियंता खान, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, उपविभागीय अभियंता चौधरी, इत्यादी उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top