0
smsnews,प्रतिनिधी महादेव हिले मुंबई'मातोश्री'वर धडकणारा दिव्यांग सेनेचा मोर्चा पोलिसांनी अडवला, दिव्यांगांनी बॅरिकेट्स तोडले
दिव्यांग सेना आणि पोलीस मध्ये संघर्ष

आश्वासनानंतर दिव्यांगांची माघार

...अन्यथा भीक मांगो आंदोलन
भीक मांगो आंदोलन ची सूरवात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पासून -प्रसाद साळवी

मुंबई:-दिव्यांग सेनेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध महत्वाच्या मागणी करता शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या वांद्रे येथील निवासस्थाना वर दिव्यांग सेना आपल्या मागणीसाठी शेकाप भवन माहीम येथून निघाले असता यांचा मोर्चा शेकाप भवन ची ती चिंचोळी गल्ली पार करण्या अगोदरच पोलिसांच्या वतीने आढवण्यात आला …
मोर्च्या आढवण्यात येत असताना दिव्यांग आक्रमक झाले पण पोलिसांच्या वतीने ३०० फोर्सचा वापर करत हा मोर्च्या अडवला. दिव्यांगांनी बॅरिकेट्स तोडून आक्रमकता पाहून पोलीस अधिकारी यांनी मातोश्रीवरून शिष्टमंडळ आपल्या भेटीस येत आहे व आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करा अश्या प्रकारे आवाहन करण्यात आले.
प्रसाद साळवी दिव्यांग सेना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते .
प्रसाद साळवी यांनी पत्रकार  सोबत बोलताना आपला संताप व्यक्त केला दिव्यांग सेनेचा हा मोर्चा आम्ही मातोश्रीवर नेण्याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी महापालिकेवर सेनेची सत्ता आहे . मुंबई, कल्याण डोंबिवली , अंबरनाथ नगर परिषद , सेनेची सत्ता आहे तसेच परिवहन मंत्री, आरोग्य मंत्री, उद्योग मंत्री सेनेचे आहेत आणि आमच्या बऱ्याच मागण्या यांच्या खात्याशी निगडित आहेत . आम्हाला एसटी सवलत असेल , आम्हाला उद्योगा साठी जागा असेल , आरोग्य विमा या सारख्या महत्वाच्या मागण्या घेऊन आम्ही मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यास निघालो होतो पण सेनेच्या वाघाचे उंदीर झाले आहे बहुदा दिव्यांगांचा मोर्चा पाहून किंवा आमच्या मागण्या बाबत सेनेचे धोरण उदासीन वाटत आहे आज बाळासाहेब ठाकरे यांची खरच फार आठवण होते त्यांनी आम्हा दिव्यांग जणांचा हसत स्वागत केलं असत व आमच्या मागण्या एकूण घेऊन मान्यही केल्या असत्या पण सेनेच्या कोणत्याही नेत्यांमध्ये साहेबांचे गुण नाहीत अश्या शब्दात साळवी यांनी टीका केली व लवकरच महाराष्ट्रभरात सेनेच्या आमदार खासदार ,नगरसेवक यांच्या कडे जाऊन आम्ही भीकमांगो आंदोलन करणार आहोत व भीक मांगो आंदोलन ची सूरवात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पासून आसे प्रसाद साळवी म्हणाले. या विषयावर पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला देखील धारेवर धरणार आहोत या आमचे हे पहिल्या टप्याचे आंदोलन पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचा दबावखाली हणून पडण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या टप्याचे आंदोलन हे उग्र असेल व याची सर्व जबाबदारी सेने ची व सत्ताधारी सरकारची असेल अश्या कठोर शब्दांत दिव्यांग सेना अध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली …
या मोर्चा मध्ये दिव्यांग सेना सरचिटणीस रोहन सातार्डेकर, कायदेशीर सल्लागार सुरेश कोलते, मनोज सातोसे ठाणे जिल्हा अध्यक्ष, नितीन गायकवाड महाराष्ट्र सचिव, मोहन गुरव मुंबई अध्यक्ष, जयेश मुरलीधर महाराष्ट्र सहसचिव, सोमनाथ माळी महाराष्ट्र सहसचिव, रेहाना कुरेशी ठाणे जिल्हा सरचिटणीस, चैताली झगडे कल्याण शहर अध्यक्ष, अनिल शिंगणे अंबरनाथ शहर अध्यक्ष, दिलीप कांबळे उल्हासनगर शहर अध्यक्ष,आणि ईतादी दिव्यांग सेनेचे कार्यकर्ते उपोस्थित होते.

(सोशल मिडिया प्रमुख-दिव्यांग सेना)
+919503071821

टिप्पणी पोस्ट करा

 
Top