0

औराद आणि परीसरात दारु विक्री जोमात ,शासनआणि प्रशासन गेले कोमात...


औराद शहा.(प्रतिनिधी अमोल ढोरसिंगे)
दि.२१ महाराष्ट्र - कर्नाटक सिमेवर असलेल्या या गावाला पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अशिर्वादाने अवैद्यदारु विक्री धंदे जोमात सुरु आहेत.याबाबत अधिक माहीती अशी की,औराद गाव सिमावर्ती भागात असल्यामुळे आणि चांगली बाजारपेठ असल्यामुळे या गावाला जवळपास २० ते २५ खेड्या गावातील लोकांचा येण्या- जाण्याचा ओघ असतो आणि या गावावरच अवलंबून बरेचसे व्यवहार परीसरातील गावांचे होतात.या गावात ६० ते ७० आडत दुकाने आहेत,३० किराणा दुकाने आहेत,१५ कापड दुकाने आहेत,८ते १० कापड दुकाने व इतरही बरेचसे दुकानांची बाजारपेठ आहे म्हणूनच या गावाला परीसरातील सिमावर्ती भागातुन लोक येतात.म्हणुन काही अवैद्यधंदे करणारे समाजकंटक लोक स्वतः चे फायदे करुन घेण्यासाठी आणि खळगे भरवुन घेण्यासाठी प्रशासनाला आमिष दाखवुन अवैद्यधंदे जोमात सुरु केले आहेत.

         या गावात आणि परीसरात जी काही देशी दारु विक्री होत आहे ती रीतसर राज्यमार्गालगत परवाना धारक जशी दुकाणे थाटतात तशाच पध्दतीने दुकाणे थाटुन रात्रंदिवस खुलेआमपणे दारु विक्री होत आहे. राज्यमार्गाप्रमाणेच भर वस्तीतही बरेचसे लोक आपल्या घरीच दुकाने थाटुन सर्रास दारु विक्री करीत आहेत.आणि या सर्व अवैद्य दारु विक्री करणाऱ्या लोकांना सौदागर यांचे परवानाधारक देशी दारु विक्री दुकानातुनच निर्भीडपणे खुलेआम बाॕक्सच्या बाॕक्स दारु पुरवठा केला जात आहे.

        राज्य उत्पादन शुल्क विभाग(दारुबंदी विभाग) आणि स्थानीक पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवुन अवैद्य दारु विक्रीवर कार्यवाही करणे अपेक्षित असतानाही संयुक्तपणे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानीक पोलीस हे अवैद्य दारु विक्रीवर नियंत्रण ठेवणे आणि कार्यवाही करण्याचे सोडुन दरा मलेदा घेऊन किरकोळ कार्यवाही करुन सोडण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन यांचे उघडपणे दिसत आहे.कारण स्थानीक पोलीस प्रशासनाने अवैद्य दारु विक्रीवर नियंत्रण ठेवताना गुन्हे दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना संबंधीत गैरप्रकारा विषयी लेखी तक्रार करुनही या गावाकडं साधे बघण्यासही वेळ मिळत नाही.असे वागत असल्यामुळे या विभागावर भष्टाचार होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे . अशा या भष्ट प्रशासनामुळे गोरगरीब कुटुंबातील लोकांची घरे व्यसनाधीनतेमुळे फुटत आहेत तरुण वर्गही या व्यसनांकडे लवकर आकर्षीत होत आहेत.आणि हा व्यावसाय करण्याकडे काही लोक आकर्षित  होत आहेत. मुख्य चौकांमध्येही अशीच दृश्य बघण्यास लोकांना मिळत आहे.महीलांनाही रस्त्यावर फिरणे अवघड झालेले असल्याचे पहावयास मिळत आहे.
  या सर्व प्रकाराला कोण जबादार आहे ? हा प्रश्न औरादमधील नागरीक तसेच महीला वर्गाला पडलेला आहे.कारण काही नागरीकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी यांना फोन केले आणि प्रत्यक्षात कार्यालयात जाऊन तक्रारही दिली परंतु सदरची काहीच फरक पडला नाही  सांगतात आणि आपल्या कर्तव्याला बगल देण्याचे काम करतात.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top