भिवंडी महापालिकेच्या तीन लिपिकांवर फौजदारी गुन्हा
ठाणे - तीन लिपिकांवर मालमत्तेवर बोगस कर आकारणी केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा केल्याने भिवंडी पालिका वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. राजेंद्र गायकवाड, जयवंत सुर्यवंशी, धर्मेंद्र जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या लिपिकांची नावे आहेत.
कामचुकारपणा, हलगर्जीपणा, आर्थिक भ्रष्टाचार या कारणांवरून दोन महिन्यात डझनभराहून अधिक अधिकारी -कर्मचाऱ्यांना भिवंडी महापालिका आयुक्तांनी घराचा रस्ता दाखवला. तर चार अधिकाऱ्यावर निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशाने उपायुक्त विनोद शिंगटे यांनी विधी अधिकारी अनिल प्रधान यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अनिल प्रधान यांनी तिघांच्या विरोधात भा.दं. वि. ४६८, ४७१, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी संगनमत करून पालिकेच्या प्रभाग समिती क्र. १ क्षेत्रातील ४४३/२ व ४४३/३ या मालमत्तेचे बोगस प्रस्ताव तयार करून तत्कालीन करमुल्यांकन अधिकारी मोरेश्वर पाटील यांची खोटी सही करून महापालिका दप्तरी व संगणकीय आज्ञाप्रणालीमध्ये नोंद करून सदर मालमत्तेवर बोगस कर आकारणी केली. त्यामुळे पालिकेचे ४४ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाल्याने तीन लिपिकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय दिगंबर कोपरे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा