0

दर्यापूर मतदारसंघाच्या विकासात 3 कोटी 10
 लक्षची भर
------------------------------------------------------
प्रतिनिधी जयेंद्र गाडगे

दर्यापुर: दर्यापूर विभागाचे लोकप्रिय आमदार  मा, श्री,रमेशजी बुंदीले यांचे हस्ते 3कोटी 10 लक्षच्या  कामाचा भूमीपूजन सोहळा दिनांक 25/01/2018 रोजी गुरुवार ला मतदाता दिवसाच्या शुभ मुहूर्तावर आं.रमेशभाऊ बुंदीलेच्या हस्ते भाजपा कार्यकर्ते,पदाधिकारी, सरपंच व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला.  उमरी,येवदा, वडनेर गंगाई,सासण, रामगड रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय होती.यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता अनेक नागरिकांच्या तक्रारी आमदार रमेशभाऊ बुंदीले यांच्या कडे प्राप्त होताच रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन देऊन खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली. या केलेल्या कामा बद्दल आंमदार रमेशभाऊ बुंदीले यांचे अनेक गावातील नागरिकांनी आभार मानले सदरील कामाच्या भूमिपूजन प्रसंगी तालुका अध्यक्ष विजय मेंढे,मनीष कोरपे, माणिकराव मानकर, रामदासजी कराळे, ओंमभाऊ शर्मा, किरणताई देशमुख, बाळासाहेब राऊत, बाळासाहेब वडतकर, नन्दुशेठ लोहिया, केशव लोडम, रवी लाजूरकर, विनय गावंडे, विजय लाजूरकर, विनायकराव लाजूरकर,अण्णासाहेब भांडे,प्रमोद वांदे, शाम ठाकरे, दिलीप वडतकर, गजानन वडतकर,गोपाल डालके, रवी पाचपोहे, रामेश्वरभाऊ, गालिब शहा,गोपाल रेवस्कर ,राजूपाटील हुतके, जिकिर भाई दिपक पारोदे व संबंधित गावांचे सरपंच,सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top