0

 शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली जमीन भुमाफीयाच्या घशात जाऊ नये अन्यंथा तिव्र आंदोलन...प्रदीप येवले 

अजंनगाव सुर्जी,प्रतिनिधी:-जयेंद्र गाडगे
 अजंनगाव बाजार समीतीने बाजार समीतीच्या लागुन असलेली व बाजार समीतीला आरक्षित असलेले शेत .2003 सालीच भूसंपादनाची कार्यवाही सुरु होती कार्यवाही सुरू असतांना बाजार समीतीला न्यायालयीन कार्यवाहीला सामोरे जावे लागले .मध्यंतरीच्या काळात प्रशासकीय राजवटीत प्रशासन व भुमाफीया यांचे संबंध निर्माण झाले होते.न्यायालयाने बाजार समीती कडुन निर्णय दिला .व त्यावर मा.जिल्हाधिकारी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बाजार समीतीला निधी पुरवीण्याचे व कलम 19 ची कारवाई करण्याचे पत्र 6..12 ला दिले आणी जमीन संपादित करण्याचे आदेश दिले परंतु यावर संचालक मंडळाने दुर्लक्ष करून दोन महीण्याने बैठक बोलावून यावर वकीलाचा सल्ला घेण्याचा ठराव केला .वास्तविक न्यायालयाच्या निर्देश असतांना असा शेतकरी हिताविरुध्द भुमीका संचालक मंडळाने घेऊ नये शेतकऱ्यांनी ज्या आशेने या संचालक मंडळाला निवडणून दिले त्यांची निराशा होऊ नये येथे अनेक शेतकऱ्यांना या जमीनीवर रोजगार व शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी बाजार समीती करु शकते .म्हणून भुमाफीयाच्या घशात ही जमीन जाऊ नये यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे वक्ता जिल्हाध्यक्ष  प्रदीप येवले यांनी सर्व पदाधिकारी समवेत मा.तहसीलदार,बाजार समीती सचिव व सहाय्यक निबंधक यांना निवेदन दिले यावेळी प्रदीप येवले .स्मिताताई घोघरे मा.जिल्हाध्यक्ष .राजेंद्र पा.बारब्दे वक्ता तालुकाध्यक्ष फहीमोद्दीन नगरसेवक .अफसर बेग शहराध्यक्ष .निलीमाताई कडु .जिल्हा सचिव .खालीद सलीम.नईम जमीनदार .रघुनाथराव भुयार .मो.सलीम शिवम पा.खाडे .एजाज अली .राजेंद्र चंदनपत्री यानी निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top