1

उस्मानाबाद:-प्रतिनिधी अवैध दारू विक्रीची बातमी प्रसिध्द केल्याच्या रागातून पत्रकार कैलास चौधरी यांना दारू विक्रेत्यासह गावगुंडांनी जबर मारहाण केल्याची घटना लोहारा तालुक्यातील हिप्परगा येथे घडली़ या घटनेचा जिल्ह्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध केला असून संबधीत गावगुंंडावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी (दि़२९) जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे़
हिप्परगा येथे दारूबंदी करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते़ याचे वृत्त पत्रकार चौधरी यांनी प्रसिध्द केले होते़ याचा राग मनात धरून सरपंच रामा मोरे, अनिल मोरे, सोमनाथ मोरे, विनोद मोरे यांनी चौधरी यांना रविवारी (दि़२८) जबर मारहाण केली़ या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे़ निवेदनावर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस राजाभाऊ वैद्य, पत्रकार देविदास पाठक, प्रशांत कावरे, मल्लिकार्जून सोनवणे, कैलास चौधरी, धनंजय पाटील, हेमंत कुलकर्णी, संतोष खुने, संतोष शेटे,आकाश नरोटे, ज्ञानेश्वर पाटील, अजित बडवे, सुजित बडवे, शाहरूख सय्यद, प्रशांत कावरे, कलीम मुसा, सय्यद मनसूर कलाम, सलीम पठाण, दत्ता बारकुल, हेमंत कुलकर्णी, मच्छिंद्र कदम, गिरीष जव्हेरी, मुस्तफा पठाण, बिभीषण लोकरे, छायाचित्रकार राहुल कोरे, अजिंक्य माने, बाळासाहेब अणदुरकर आदींची उपस्थिती होती़ 

टिप्पणी पोस्ट करा

 
Top