कोल्हापूरः प्रतिनिधी
पंचगगा नदीवरील शिवाजी पूलावरून टेम्पो ट्रव्हल पूलाचा कटडा तोडून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. या अपघातात जवळपास ७ ते ८ जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे.
जखमी बालेवाडी, पिरंगुट पुणे येथील असून गणपतीपुळ्याहून कोल्हापुरात येताना शिवजी पुलाचा कठडा तोडून ट्रॅव्हलर (एमएच १२ एनएस ८५५६) पंचगंगा नदीत कोसळली. ट्रॅव्हलरमध्ये एकाच कुटुंबातील १६ जणांचा व एक चालक अशा १७ जणांचा समावेश आहे.
बुधवार पेठेतील स्थानिक लोकांच्या मदतीने सुरूवातीला बचाव कार्य सुरू होते, २ तासानंतर व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ट्रव्हल्समध्ये १७ जण होते यापैकी ७ जणांना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले असून काहीजण गाडीत अडकून पडले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा