0

नवी मुंबई प्रतिनिधी  आमदार मंदा म्हात्रे यांनी वाशी सेक्टर - ९ येथील फळ व भाजी मार्केटची पाहणी करून मार्केटच्या दयनीय अवस्थेची पाहणी करून येथील भाजी व फळ विक्रेत्यांशी सवांद साधून त्यांच्या समस्या आणि व्यथा जाणून घेतल्या . यादौऱ्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले कि , या मार्केटमध्ये शेड आणि शैचालायासाठी आपण आपल्या आमदार निधीतून १ कोटींचा निधी दिला आहे मात्र यात राजकारण करून जाणीवपूर्वक आपल्या आमदार निधीतून हे काम स्थानिक नगरसेवक व माजी उपमहापौर हे होऊ देत नाही आहे . त्यामुळे जरी यात राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करत असले तरी देखील माहापालिका आयुक्त आपल्या अधिकाराचा वापर करून हे काम करु शकतात मात्र आद्यपही याबाबतीत पाऊल उचली गेली नाही आहे .
त्यामुळे जर या ठिकाणी शेड कोसळून जर मनुष्यहानी झाली तर यासाठी जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल .
स्थानिक नगरसवेकांचा दावा खोडून काढत आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले कि , नाल्याचे कारण पुढे करून आमदार निधीतून होणाऱ्या कामात अडथळा आणण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होत आहे . मात्र या ठिकाणी सिडकोने भविष्याचा विचार करून फक्त नाल्याचे प्रोव्हिजन केले आहे .आमदार मंदा म्हात्रे या जेव्हा पाहणी दौऱ्यादरम्यान  भाजी व फळ विक्रेत्यांशी सवांद साधत होत्या तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले कि , त्यांच्याकडून काही महापालिका अधिकारी आणि वेगवेगळ्या फेरीवाला संघटनेकडून हफ्त्याची मागणी केली जाते आणि जेव्हा हफ्ता हा दिला जात नाही तेव्हा त्यांना कारवाईबाबत दमदाटी केली जात आहे . तर जे त्यांना हफ्ता देत आहेत त्यांना वाशी सेक्टर - ९ येथे व्यवसाय करण्यासाठी आश्रय दिला जात आहे . या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांच्या असे देखील निदर्शनास आले कि  , आज ह्या  विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात छळवणूक होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

 
Top