0



गडचिरोली,प्रतिनिधी आमगाव ता.चामोर्शि जिल्हा गड.चे ग्राम विस्तारक अधिकारी प्रदिप भांडेकर ह्यानि ग्रा.पं.कुनघाडा,आमगाव महाल ह्या ग्रा.पं. मध्ये मोठ्या प्रमानात भ्रष्टाचार केलेला आहे.याची चौकशी करण्यात आली त्यात ते सिद्ध झाले परंतु भांडेकर याला राजकीय अभय असल्यामुळे कार्यवाही  होत नव्हती. म्हणुन बाबुराव गट्टीवार माजी सरपंच ,नाजुकराव वाळके ग्रा.पं.सदश्य आमगाव महाल हे गड.जि.प.चे पुढे उपोषणास बसले पण प्रशासन  लक्ष देत नव्हते.ही बाब विलास कोडापे प्रदेश सचिव बि.आर.एस.पि. यांना कळली. त्यांनी काल दिंनाक ९-२-१८ ला उपोषण कर्त्याची भेट घेतली व तसेच कार्यवाही बाबत धनकर उप मुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) यांचेशि चर्चा केली. यावेळेस चौकशी अधिकारी मुद्धमवार हे सुद्धा उपस्थित होते.
दोषिवर  कार्यवाही न झाल्यास व पुढे २ दिवस सुट्या असल्यामुळे उपोषन कर्त्याचे जिवास काही झाल्यास आपणास जबाबदार धरुण बि.आर.एस.पि.चे वतीने
तिव्र आंदोलन करन्याचा इशारा देन्यात आला.
यावेळेस सदाशिव निमगडे सचिव लोकसभा क्षेत्र, पुरषोत्तम रामटेके गड.विधानसभा क्षेत्र हे सोबत होते.
बि.आर.एस.पि. च्या इशार्‍याने  सांयकाळी प्रदिप भांडेकर ग्राम विस्तार अधिकारी यास निलबिंत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top