0
दुबई आँनलाईन बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिचे शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हार्ट अटॅकने निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीने या जगातून कायमची एक्झिट घेतली. दुबईत तिचे निधन झाले. श्रीदेवीचे पार्थिव सध्या दुबई पोलिसांच्या ताब्यात असून तिथे तिच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. श्रीदेवीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी घेऊन जातानाचे एक छायाचित्र समोर आले आहे. शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबायांना सुपूर्त केले जाणार आहे.
पार्थिव आणण्यासाठी मुंबईहून चार्टर्ड प्लेन दुबईला रवाना...
श्रीदेवीच्या पार्थिवावर दुबईतील Qusais स्थित पोलिस हेड क्वार्टरनजीकच्या शवगृहात पोस्टमार्टम सुरु आहे. श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी मुंबहून दुबईला चार्टर्ड प्लेन रवाना झाले असून रात्री अकराच्या सुमारास कपूर कुटुंबीय पार्थिव घेऊन मुंबईत दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. उद्या मुंबईत श्रीदेवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशीसोबत दुबईत होती. बॉलिवूडच्या चांदनीच्या अकाली एक्झिटने अवघ्या बॉलिवूडसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूच्या शिवकाली येथे जन्मलेल्या श्रीदेवीने 50 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2017 मध्ये श्रीदेवीच्या फिल्मी करिअरला 50 वर्षे पूर्ण झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top