अंजनगांव/अमरावती SMSNews प्रतिनिधी जयेंद्र गाडगे
गजानन महाराज प्रगट दिना निमित्य सावाळापुर ते शेगाव जाणाऱ्या श्रींच्या पालखीचे अंजनगाव टांक नगर गजानन मंदीराच्या परिसरात भव्य स्वागत करण्यात आले . श्रींची पालखी सौ .बेलाताई मंगळे यांच्या निवास्थानी पुजा अर्चा आरती व दर्शन सोहळा संपन्न झाला या वेळी पालखी प्रमुख सौ. वर्षाताई धाबे यांनी उपस्थीतांना आपल्या कीर्तन पर साहीत्यीक शब्द शैलीत, मार्गदर्शन करित असतांना श्रींची पालखी येता घरा, तोची दिवाळी दसरा असे भाव पुर्ण उदगार काढले. श्रींच्या दोनशे वारकऱ्यांसह टाळमृदंग अभंगवाणी झेंडे भगव्या पताका पालखीच्या आगमनाने टांक नगरातील महीलांनी सडा सारवन करुन सुंदर रांगोळ्या काढल्या व प्रत्येकाने आपआपल्या घरासमोर श्रींचा फोटो ठेउन पालखीचे पुजन व दर्शन घेतले टांक नगर परिसरात जनु काही पंढरपूर आल्याचे वातावरण निर्मिती झाली होती सर्व भाविक भक्तांना अल्पोहार प्रा. हेमंतराव मंगळे तर चहापाणी श्री डांबरे यांनी अतीशय उत्कृष्ठ व्यवस्था केली होती सदुर्हु सोहळा यशस्वी करण्याकरिता टांक नगरातील महीला व पुरुषांनी मोलाचे सहकार्य केल्या बद्दल अंजनगाव पं.स.मा. सभापती शशिकांत पाटील मंगळे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा