अकोला,
दहा राज्यांना जोडणारा अकोला खंडवा मीटर गेज लाईन चे ब्रॉडगेज मध्ये कामाला लवकरच गती प्राप्त होऊन अकोला अकोट रेल्वे ब्रॉडगेज कामाची पाहणी करून नागरिक शेतकरी ग्रामस्थ यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन कमी वेळात रेल्वे पूल व ब्रॉडगेज चे काम दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या माध्यमातून सुरू असून कामकाजबद्दल खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी समाधान व्यक्त करून कामाची पाहणी केली .आज अचानक अर्थ संकल्पिय बजेट च्या सुटीच्या दरम्यान खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी शेतकरी व्यापारी सरकारी कर्मचारी भाजपा कार्यकर्ता हितचिंतकाशी सुसंवाद साधून या बजेट संदर्भात चर्चा विनिमय करून रेल्वे प्रवाश्यांची समस्या जाणून ब्रॉडगेज रेल्वे कामाची पाहणी करून आपल्या कार्यशीलतेचा व मतदारांविषयी कर्तव्य भावनेचा परिचय दिला .आज त्यांनी अकोला दक्षिण मध्य रेल्वे स्थानक पासून तर 22 किलोमीटर च्या रेल्वे मार्गाची पाहणी केली .व ग्रामस्थांच्या सूचनाची दखल घ्यावी अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या .या वेळी दक्षिण मध्य रेल्वेचे कार्यकारी अभियंता नारायण श्रीवास्तव आणि दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता आशुतोष यादव हे होते तर यावेळी पाहणी करण्यासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे सोबत आमदार रणधीर भाऊ सावरकर , तेजराव थोरात , किशोर मांगटे पाटील , उपमहापौर वैशाली ताई शेळके , विलास शेळके ,बाल ताले,विवेक भरणे ,अनिल गावंडे , गजानन लोणकर ,राहुल देशमुख , चंदा शर्मा , गीतांजली शेगोकार ,वसंत बाच्छुकां , एड सुभाषसिंग ठाकूर ,नंदा पाटील , सारिका जैस्वाल , योगिता पावसाळे , टोलू जैस्वाल बबलू पलसपगार,हरीश अमानकर,संतोष वाकोडे , गिरीश देशमुख , वसंता मानकर , डॉ संजय शर्मा , रणजित खेडकर हरिभाऊ काळे , रमेश अप्पा कपरे ,अभिजित बांगर , आदी यावेळी उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा