----------------------------------------------
विजेच्या जिवंत ताराचा स्पर्श होऊन गोऱ्हा ठारशिंगोरी येथील घटना ....वरूड,बेनोडा (शहीद ) पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी येथील धनराज मारोतराव बोंदरे वय ३६ वर्ष यांच्या मालकीच्या पाच वर्षाच्या गोऱ्याचा आज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली यामध्ये विजेच्या जिवंत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन झाल्या घर्षणामुळे तारा तुटून गोऱ्याच्या अंगावर पडल्यामुळे गोऱ्यांचा मृत्यू झाला यामध्ये शेतकऱ्याचे २५ हजार रूपयाचे नुकसान झाले असुन महावितरण कार्यालयाने शेतकऱ्याला नुकसान भरपई देण्याची मागणी केली आहे.
वरूड - तळेगाव राज्यमार्गावर झाड पडल्यामुळे दोन तास बंद
वरूड : (तालुका प्रतिनीधी ) पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजुरा बाजार अमडापूर नजीक पेट्रोल पंपाजवळील रस्ताच्या काठावरील मोठे झाड पडल्यामुळे रस्ताच्या दुतर्फा वाहाणाच्या लांबाच लांब रांगा लागल्या होत्या नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना घटनेची भ्रमनध्वनीवरून माहीती देतात त्यांनी जेसीबी मशीन व कर्मचाऱ्यांना घटनास्यळावर पाठवून वाहतूक सुरळीत केल्याची घटना आज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली.
एसटी बससह शेकडो वाहने रस्त्याच्या खाली घसरली ; जिवीतहाणी मात्र टळली
वरूडर- अमरावती राज्य मार्गावरील घटना
वरुड : (तालुका प्रतिनीधी ) आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे सर्वाचीच धावपळ सुटली कुठे नालीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते तर कुठे रस्तावरुन वाहने घसरत असल्याचे आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार आज झालेल्या वादळी पावसाने सर्वाचीच पोल खोल केली त्यामधे एच. जी. इन्फ्रा कंपनी कडून रस्त्याचे बांधकाम सुर आहे. आज झालेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाणे सुरवात केल्यामुळे रस्तावर सर्वत्र रेंदाच रेंदा झाल्यामुळे रस्ताने जानारी लहाण मोठी वाहणे चिखलामुळे इकडे तिकडे घसरूलागली यामुळे काही वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रन सुटून वाहने रस्त्याच्या साईडला खाली उतरून खंतीत गेल्यामुळे काहीकाळ अमरावती मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती यामध्ये एक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मोर्शी जानारी बस होती तर टाटा मॅजीक कंपनीचा पाण्याच्या कॅनचा पुरवठा करणाऱ्या छोटा हाती याला जेसीबिच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. तर काही दुचाकीस्वारही घसरून पडल्याची विस्वसनीय माहीती आहे. ही घटना दूपारी १२ : ३० च्या दरम्यान घडल्यामुळे वाहतूकीचा खेळ खंडोबा झाला हे मात्र विषेश
वाई (खुर्द ) येथे विज पडून सात गाई ठार
अंदाजे एक लाखाचे नुकसान
वरूड : ( तालुका प्रतिनिधी )तालुक्या अंतर्गत येत असलेल्या वाई (खुर्द ) येथे विज पडून सात गाई जनावरे ठार झाल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली मीळालेल्या माहितीनुसार
वाई खुर्द येथील गुराखी धनराज परतेती व सुखीलाल धुर्वे यांनी गाई चराई करण्यासाठी नेले असता अचानक वादळी वाऱ्यासह विजाचा कळकळाट होवून विज पडून गावातीलच नामदेवराव फुसे, राजेश सोमकुवर, परसराम गजाम, प्रफुल्ल सोमकुवर, सविताबाई सीताराम अहाके, सीताबाई चंद्रभानजि ढबाले व गणपत मसराम यांच्या मालकीच्या गाई मरण पावल्यामुळे शेतकऱ्यान वर आर्थिक संकट कोसळे आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची हालत झाली आहे. शेतकऱ्यांच्या गोवंशांचे नुकसाण झाल्यामुळे शासनाने त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा