जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून मागील त्या हाताला काम देण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.दिनांक 25 डिसेंबर 2017 रोजी शेतकरी कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुष्काळाची चाहूल लागल्यामुळे एकत्र येऊन दुष्काळी परिषद घेतली होती. त्यामध्ये प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशक यांची परिस्थिती लक्षात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यावर कुठलीही प्रतिक्रिया आपल्याकडून किंवा शासनाकडुन आली नाही म्हणून आज दिनांक 12 फेब्रुवारी 2018 रोजी संतप्त शेतकरी कामगार सुशिक्षित बेरोजगार हे एकत्र येऊन तहसील कार्यालयासमोर घेराव घालण्यासाठी आलो आहोत. आज आमची परिस्थिती पाहिली तर खूप बिकट आहे.या वर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्यामुळे पिके गेली आहेत.त्यामुळे उत्पन्न आले नाही. पीक गेल्यामुळे जनावरांना चारा नाही. त्याचबरोबर नरेगाची कामे मागील चार वर्षे झाली नाहीत. त्यामुळे शेतकरी,कामगार वर्ग अडचणीत सापडत आहे.आपण या विषयावर गांभीर्याने शेतकरी कामगार सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा जर कुणी आपल्या परिस्थितीला किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून आपलं जीवन कोणत्याही मार्गाने संपविले तर प्रशासन व मुख्यमंत्री विरुद्ध 302 चा गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याचबरोबर जनावरांचाही मृत्यू झाला तर संबंधित तरतुदी नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. म्हणून आपल्या निर्देशात आलेली परिस्थितीवर आपण लवकरात लवकर कारवाई करून दुष्काळ जाहीर करण्याची पावले उचलावीत.खालील मागण्या आपण मान्य करून सकारात्मक निर्णय घ्यावेत.
मागण्या
(०१) अकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा
(०२) हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
(०३) जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी.
(०४)शेतकरी मजुरांना ताबडतोब कामे उपलब्ध करुन देण्यात यावी.
(०५) गावोगावी पिण्याचे शुद्ध पाण्याची टंचाई निर्माण होण्यापूर्वी त्यांची काळजी घेण्यात यावी.
(०६) वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
वरील मागण्यासंदर्भात गंभीर होऊन आपण किंवा शासन निर्णय घेत नसाल तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पूर्णपणे शासन जबाबदार असेल.
ह्या मुद्दयासह शेतकरी कामकार सुशिक्षित बेरोजगार यांनी मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा