0
शेतकरी
 

जयेंद्र गाडगे प्रतिनिधि.अंजनगाव सुर्जी.१६ मार्च रोजी अजंनगाव सुर्जी येथे सिध्देश मंगलमधे शेतकरी हल्लाबोल मेळाव्यातचे आयोजन करण्यात आले होते.शेतकऱ्यांना सरकार नुसत्या फसव्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक सरकार करीत आहे.आज कधी नव्हे अशी कठीण परीस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे.कोणत्याही शेतीमालाला भाव नाही .बोडंअळीमुळे कापूस उत्पादन नाही. गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत अद्याप पर्यंत नाही .कर्जमाफीची घोषणा सरकारने केली परंतु सरकार शेतकऱ्यांना झुलवतच आहे .यासाठी शेतकऱ्यांनी जागृत होउन संघटीत होऊन सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घघाटक माजी मंत्री अनिलबाबु देशमुख व अध्यक्ष वक्ता प्रदेशाध्यक्ष प्रदीपदादा सोळुंके हे होते .प्रचंड संख्येने स्वयमस्फुर्तिने  शेतकरी उपस्थित झाले होते.आपल्या उदघाटणीय भाषनात अनिल देशमुख यांनी सरकारचा नाकर्तेपणा आपल्या सांगुन शेतकऱ्यांचे सरकार सत्तेवर आणावे असे आवाहन केले .सौ.सुरेखाताई ठाकरे यांनी सुध्दा सरकारवर हल्लाबोल केला .व मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक व अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष व जगप्रसिध्द शिवव्याख्याते प्रदीपदादा सोळुंके यांनी आपल्या अभ्यासपुर्ण वाणीतून शेतकऱ्यांची आजची दशा का? व उद्या आपल्याला कोणती दिशा ठरवावी लागेल हे विस्तृत सांगितले महाराष्ट्रात कोणताही समाज सध्या सुखी नाही.मुस्लिमांना बदनाम करून सत्ता काबीज करण्याचे उद्योग या लोकांचे आहेत . शेतकरी कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा नुसता सरकारने छळ केला .शेतकऱ्यांचे दुखः फक्त शरद पवार हेच समजु शकतात .संत तुकोबाराय व छत्रपती शिवरायानंतर सरगट कर्जमाफी फक्त शरद पवार यांनीघ केली  त्यांनी ' शेतकऱ्यांना जाणीव करून दिली या मेळाव्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना शिलाई म्हशीन्सचे सुध्दा वाटप करण्यात आले .यावेळी मंचावर उपस्थित उद्घघाटक अनिल देशमुख ,अध्यक्ष प्रदीपदादा सोळुंके .सौ.सुरेखाताई ठाकरे, शेखरभाऊ भोयर, प्रदीप राऊत, सभापती देवेंद्र पेटकर ,नितीन पवित्रकार ,मेघश्याम घोगंळे ,हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वक्ता जिल्हाध्यक्ष प्रदीप येवले यांनी केली . तर सुत्रसंचालन विकास घोगरे यांनी केले व आभार राजेंद्र बारब्दे यांनी मानले या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी ,प्रदीप येवले,राजेंद्र बारब्दे,अफसर बेग ,श्रीकृष्ण पा. सावरकर, फहीमोद्दीन ,राजीकभाई ,राजेंद्र तायडे ,स्मिताताई घोगरे ,कोल्हेताई दिनेश येवले , नईम जमीनदार,सलीमभाई ,आंदीनी यशस्वी आयोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top