अंगणवाडी सेविका व आशाताई यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जात असलेले पत्रकार पंकज हेलोडे यांच्या बाईक ला अपघात ; सुदैवाने त्यांचे प्राण वाचले
बुलढाणा(प्रतिनिधी) दि.१२ मार्च २०१८,
अंगणवाडी सेविका व आशाताई यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पत्रकार पंकज हेलोडे हे सकाळी ८ वाजता घरुन निघाले असता निपाणा या गावाजवळ त्यांचा अपघात झाला.सुमारे ११ वाजता च्या आसपास बाईक ला चार चाकी वाहणाने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.यावेळी सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.पंकज हेलोडे हे स्वराष्ट्र माझा न्यूज चँनल या वेब पोर्टल चे सह-संपादक आहेत व ते नेहमी पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकांच्या समस्या निर्भीडपणे सोडवत असतात.

टिप्पणी पोस्ट करा