बाबासाहेबांमुळेच बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून खऱ्या अर्थाने स्त्रीला ह्या बंधनातून मुक्त केले आहे. त्याचबरोबर संविधानात स्त्रियांना समान हक्क देण्याची तरतुद नमूद केलेली
आहे . सर्वांना समान अधिकार आहेत . म्हणूनच आजची महिला हि
सर्व क्षेत्रात पुढे आहे . आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून
उभी आहे . आणि यात सिंहाचा मोठा वाटा आहे तो माझ्या माता
यशोधरा , माता भिमाई , माता जिजाऊ , माता रमाई , माता सावित्री
यांच्या त्यागामुळेच हे शक्य होऊ शकले .
यांनी जर कष्ट उपसले नसते तर आज आंम्हीसुद्धा
कुठेतरी डोक्यावर शेणाच्या टोपल्या उचलत फिरलो असतो . शिक्षण
काय आहे हे आंम्हाला समजलेच नसते . आणि आंम्ही उच्च शिखर
गाठू शकलो नसतो . त्यांच्या त्यागामुळेच आज जगातील प्रत्येक स्त्री ही शिक्षण घेऊ शकते आहे .प्रत्येक स्त्रीने यांच्या उपकारांची जाणीव ठेवून
त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे , आचरणात आणले पाहिजे असे सौ शिल्पा सोनोने यांनी महिला यांना भाषनातुन संबोधित केले होते ....
" 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व भगिनींना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा "

टिप्पणी पोस्ट करा