0

अमरावती जयेंद्र गाडगे जिल्हा प्रतिनिधि
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  पुतळ्याचे पूजन
ग्रामगीता असलेल्या ग्रंथालयाचे लोकार्पण
कसबेगव्हान ता. अंजनगाव सुर्जी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या दांनदात्यानी दिलेल्या पुतळ्याचे पूजन व ग्रंथालयाचे उदघाटन आमदार श्री.रमेशभाऊ बुंदीलेच्या हस्ते करण्यात आले.
कसबेगव्हान येथे चांगल्या गोष्टी व विचारांची देवाणघेवाण सुरवात व्हावी या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला दररोज गुरुदेव प्रार्थना करण्याचा संकल्प करण्यात आला व ग्रामगीता व वैचारिक पुस्तके उपलब्ध असलेल्या ग्रंथालयाचे उद्धाटन करण्यात आले खऱ्या अर्थाने चांगल्या विचारांची सुरवात झाली आहे.लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्ती पर्यंत या विचारांचा फायदा घेत आहेत. ग्राम विकास व्हावा गावात एकोपा राहण्याच्या दृष्टीने ग्रामगीतेच्या विचारांची गरज आज भासत आहे.आज ग्रामगीतेची गरज जगाला आहे.स्वंस्कार केंद्रा करिता निधी उपलब्ध व्हावा ही सर्व गुरुदेव भक्तांची मागणी होती. याकरिता आमदार रमेशभाऊ बुंदीले यांनी त्वरित मान्य करून 10 लक्ष निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले
या कार्यक्रमाच्या उपस्थिती मध्ये, रामेश्वर भाऊ वानखडे,  डॉ.मेहकरे प्रवीणभाऊ टाले, निखिल घुरडे, श्रीरामजी चौधरी आशिष घुरडे भारत लव्हाळे, श्याम शिरकरे ई उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

 
Top