0


औराद शहा(अमोल ढोरसिंगेदि.२५,येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॕ.ज्ञानेश्वर कदम हे वेळोवेळी रुग्णांसाठी काही ना काही उपयुक्त उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करतात आणि यशस्वी करतात आणि त्यांना वरीष्ठांकडुन  मदत तसेच कनीष्ठ कर्मचाऱ्यांकडुन मोलाची साथ ही मिळत असते म्हणून त्यांनी एक अनोखा असा आनखीनच उपकृम सुरु करण्याचा संकल्पनेतुन त्यांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या बहुतांशी गावात एक मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्याचे ठरविले आणि त्याचीच सुरुवात ही निलंगा तालुक्याच्या शेळगी या गावापासुन सुरुवात केली.
        या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन प्रा.आ.केंद्र व त्याचे अध्यक्ष हे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॕ.श्रीनीवास कदम आणि या आरोग्य शिबीराचे उद्घाटन हे जि.प.सदस्य तसेच रुग्ण कल्याण समिती प्रा.आ.केंद्र याचे अध्यक्ष सौ.कुसुमताई हालसे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या शिबीरामध्ये जवळपास २३२ रुग्णाची तपासणी करण्यात आली तसेच कांही रुग्णांना पुढील आरोग्य उपचारासाठी प्राथमीक आरोग्य केंद्र औरादमध्ये जाण्यासाठी कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या शिबीरामध्ये भेट देणारे प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा पं.स.सदस्य सौ.अंजली अनंत पाटील , शेळगीचे सरपंच बंकट बिरादार , का.बालकुंदा येथील वैद्यकीय अधिकारी श्रीधर रोडे आणि कांबळे व्ही.एल. हे तर हलगरा प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॕ.एम.एस.वंगे आणि डाॕ.माधव भंडारे आणि औराद व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजा पाटील यांची उपस्थिती होती.
        या शिबीराचे आयोजन करुन रुग्णांची सेवा करण्यासाठी चांगला उपकृम रांबविल्याबद्दल डाॕ.ज्ञानेश्वर कदम यांचे तालुका वैद्यकीय अधिकारी आणि जि.प.सदस्य सौ.कुसुमताई हालसे यांनी त्यांचे कौतुक करुन त्यांना पुढील आरोग्य शिबीर राबविण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमाने शेळगी गावातील लोकांनी त्याचे आभारही मानले.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top