0

smsnews प्रतिनिधी डहाणू,अपंग मित्र मार्गदर्शन व सेवा मंडळ डहाणू या संस्थेच्या वतीने अपंगांचे 24 वे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पालघर जिल्यातील आदिवासी विभाग डहाणू येथे थाटामाटात संपन्न झाला.यावेळी पाच अपंग जोडप्यांचे सामूहीक विवाह करून त्यांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या विवाहात एका अपंग मुलीचे कन्यादान ठाणे येथील अपंग समाजसेवक श्री.मुकेश वराळ यांनी केले.
    या कार्यक्रमात अपंग मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व तिन चाकी सायकल वाटप तसेच अपंग परीचय मेळावा घेण्यात आला.
या कार्यक्रमाला मधुकर काशीकर .रमेश मोदी.महेश करिया.दमयंती तन्ना.प्रज्ञान वानखेडे संपादक smsnews.कैलास बुचकूल.प्रमोद राणे आदि पाहूणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व संस्थापक अध्यक्ष श्री.दिलीप पाटील सर यांनी केले. आणि सूत्रसंचालन हंसा पात्रे व शुभांगी पाटील यांनी केले.आलेल्या पाहुण्यांचे आभार आर.वाय.राऊत आणि वासंती कर्णिक यांनी मानले.व कार्यक्रमाचे समारोपण संपन्न झाला

टिप्पणी पोस्ट करा

 
Top