मॅट्रो मार्गात बाधीत होणाऱ्या पादचारी पुलांच्या उक्त साहित्यांचा वापर नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी करावा मनसेचे मागणी
नव्याने बांधण्यात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांची उधळण होण्याऐवजी मॅट्रो मार्गात बाधित होणाऱ्या पादचारी पुलांच्या साहित्यांचा वापर करावा*
ठामपा सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २० डीसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये विविध नव्याने करण्यात येणाऱ्या स्थापत्य कामाचे ठराव मंजूर करण्यात आले त्यापैकी प्रकरण क्रमांक ५९१. मध्ये पोखरण रोड क्रमांक ०१ वरील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेजवळ ३५ मिटर लांब व साडेतीन मीटर रुंद असणारा पादचारी पुल सुमारे ०४ कोटि ३९ लाख रुपये खर्च करून बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला .
वडाळा मुंबई ठाणे असा नियोजित मॅट्रो प्रकल्पाचा मार्ग एल बी स रोड व ईस्ट एक्स्प्रेस हायवे येथून मार्गक्रमण असा असल्यामुळे त्यामध्ये रहेजा , विविआना मॉल , विद्यापीठ व आर मॉल येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन बाधण्यात आलेले एकूण ४ पादचारी पुल बाधीत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे जर मॅट्रो मार्गात अडथळा ठरणारे असे पादचारी पुल तोडुन भंगारातच जाणार व त्यावर झालेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याऐवजी त्या पुलांचे उक्त साहित्य नव्याने बाधण्यात येणाऱ्या पोखरण रोड क्रमांक ०१ व इतरत्र बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलासाठी केल्यास खर्च होणाऱ्या कोट्यावधी रूपयांत घट होइलच व जनतेच्या पैशाचा अपव्यय होण्यापासून टळेल सिंघानिया शाळेजवळ पुल बाधण्याच्या आधी याचा विचार विनिमय करावा अशी मागणी निखिल जाधव मनविसे - उप विभाग अध्यक्ष यांनी महानगरपालिका आयुक्त आणि राजेंद्र अहिरराव अतिरीक्त आयुक्त क्र १ यांसनिवेदन देउन केली आहे. यावेळी सागर भोसले शाखा अध्यक्ष संतोष निकम शाखा अध्यक्ष , गोकुळ बोरसे, शाखा अध्यक्ष . अक्षय आंबेरकर उपशाखा अध्यक्ष, सुनील राजगुरू गट अध्यक्ष आदि मनसे पदाअधिकारी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा