0
कान्हेरी बुध्दलेणीच्या कुशीत
बौध्द धम्म परिषदेत 15 ठराव पारीत !
नवी मुंबई smsnews विषेश प्रतिनिधी          (07 मार्च 2019
____________________________________
कान्हेरी बुध्द लेणीच्या कुशीतील बौध्द धम्म परिषदेत 15 ठराव पारीत झाले. ही परिषद मुंबई प्रदेश भिक्खू संघच्यावतीने बोरीवली पूर्व, मुंबई येथे पूज्य भदंत के. आर. लामा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डाॅ.जी.के. डोंगरगांवकर यांनी दिप प्रज्वलन आणि भगवान बुध्द, सम्राट अशोक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून केले. या धम्म परिषदेमध्ये भारतातील अनेक शहरातुन भिक्खू संघ उपस्थित होते. मुंबई इलाक्यातील धम्म उपासकांची संख्या देखील लक्षणिय या परिषदेत शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करून होते. या परिषदेमध्ये रमेश गायकवाड, नागसेन कांबळे, रवि गरूड, दिलीप वाव्हळे, रघुनाथ वाघमारे, शशिकांत बरवे, रविभाऊ हिरवे, नारायण जाधव, बाबुराव सोनावणे, रमेश पाईकराव, विश्वनाथ बोरकर, चंद्रकांत पवार, मधुकर भोरे, बबन गमरे, संध्याताई सावंत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. भिक्खू संघास भोजनदान संघराज तांबे यांनी दिले. प



बौध्द धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. डाॅ.जी.के. डोंगरगांवकर म्हणाले की, सर्व मानवप्राण्यांच्या कल्याणाचे सुत्र भगवान बुध्दाने प्राचीन काळात सांगितले आहे. भगवान बुध्दाच्या विचारावर अत्यंत श्रध्दा असलेल्या सम्राट अशोकाने विद्यामान मुंबई तथा प्राचीन सुप्पारक आणि अपरान्त नामक इलाख्यात बुध्दाचा संदेश हजारो वर्षे टिकला पाहिजेत. मानव कल्याणकारी सदधम्म हा सुखकारक असून तो अमर आहे यासाठी त्यांनी महाराष्ट्रात हजारो लेण्यांच्या माध्यमातुन भगवान बुध्दाचा धम्म जिवंत ठेवला. तो भारतीय प्राचीन संस्कृतीचा ठेवा असून 11 व्या शतकापर्यंत मुंबई आणि देशात भारतीय संस्कृतीच्या दैनंदिन व्यवहारात बुध्द धम्म रूजला होता. त्याच्या पाऊलखुणा आजसुध्दा लेण्यांच्या रूपाने विराजमान आहेत. त्याचे जतन करणे, हे सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. यासाठी अशा धम्म परिषदेची आवश्यकता आहे. पु.भन्ते शांतीरत्न यांनी मुुंबई प्रदेशातील सर्व भिक्खूंना संघटीत करून दरवर्षी बौध्द धम्म परिषद कान्हेरी बुध्द लेणीच्या कुशीत येतात हा त्यांच्या असिम निष्ठेची पावती आहे.



या धम्म परिषदेमध्ये पु. भदंत राहुलबोधी महाथेरो, भन्ते बोधीशील, भन्ते नागसेन, भदंत विमलकिर्ती, भन्ते बुध्दपाल, भन्ते प्रज्ञानंद, भन्ते राहुल, भन्ते महानाम, भन्ते धम्मप्रकाश, भन्ते काश्यप, भन्ते कपिलबोधी यांनी  ‘‘आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञ संशोधक बुध्द धम्माच्या तत्वज्ञानाचे चिंतन करून धम्माच्या वाटेने जात आहेत ही बाब उल्लेखनिय आहे. जाॅब स्टिव्ह या अॅपल डिजिटल कंपनीचा मालकाने बुध्द धम्माचा स्विकार करून कम्प्युटर आणि मोबाईलला बहुजन उपेक्षित वंचिताला परवडेल असे डिजिटल साधने तयार करण्याची मानसिकता ही त्याच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या बुध्दाच्या तत्वज्ञानाची त्याच्या आचरणात झालेली फल निष्पत्ती आहे. म्हणून डिजिटलचा वापर मानवाच्या कल्याणासाठी व्हावा. डिजिटलने अफवा, खोटारडेपणा, चुकीची माहिती जनमनापर्यंत पोहोचवणे हे अकुशल कर्म आहे असे भन्ते म्हणाले.’’



या धम्म परिषदेमध्ये 15 ठरावांनी परिषदेची सांगता झाली. त्यात 1) संस्कृत भाषेचे 13 विद्यापीठ सरकारी अनुदानावर भारतात आहेत. तसेच किमान 01 पाली भाषेचे विदयापीठ अजिंठा लेणीच्या कुशीत शासनाने अनुदानासह मंजुर करावे 2) मुंबई विदयापीठ क्षेत्रात 740 काॅलेजपैकी केवळ सिध्दार्थ महाविदयालय, सत्याग्रह महाविदयालय या दोन पदवी महाविदयालयात पाली भाषा शिक्षणाची सोय आहे. त्या काॅलेजला पाली भाषा विकास आणि विस्तारासाठी शासनाने किमान 100 कोटी अनुदान व हा विषय अनुदानित करावा 3) महाराष्ट्रातील बुध्द, जैन आणि मिश्रित लेण्या हया भारतीय संस्कृतीचा ठेवा असून त्याचे जतन करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण उभारून त्याचे संरक्षण करावे. त्याचे विद्रुपीकरण करणाÚयावर कायदेशीर कार्यवाही करावी 5) महाराष्ट्र सरकारने त्रिपिठक पाली ग्रंथाचा अनुवाद प्रकल्प हाती घेतल्याबद्दल परिषदेमध्ये सरकारचा अभिनंदन ठराव करण्यात आला. त्रिपिठक पाली भाषेतुन मराठी भाषेत करण्याचा प्रकल्प त्वरीत मार्गी लावावा 6) मुंबई मध्ये बौध्द संस्कृतीचे जतन संग्रह आणि संस्कार करण्यासाठी बुध्द भवन बांधण्याचा व त्यासाठी सरकारने जमिन आणि निधी दयावा 7) आयोध्या ही रामाची जन्मभुमी आहे तशीच बौध्द संस्कृतीचा ठेवा असलेली प्राचीन काळीन साकेत नगरी ही ब्राम्हणकुलीन भिक्खू बावरी यांच्या स्मरणार्थ बांधेलेले बुध्दविहार असून बौध्दांच्या श्रध्देचा सन्मान व्हावा यासाठी विवादीत अथवा विवादाबाहेरील 100 एकर जमिन व 100 कोटी रूपये आयोध्येत बुध्द विहारासाठी भारत सरकारने दयावे. 8) 1990 मध्ये बौध्दांना अनुसूचीत जाती-जमाती संवर्ग समकक्ष समजण्यासाठी संविधानात दुरूस्ती झाली मात्र त्याची अंमलबजावणी आजतागायत झाली नाही. म्हणून बौध्दांना त्याची धर्मांतरापुर्वीच्या जातीचा उल्लेख असलेले अनुसूचीत जाती-जमाती असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे शासनाचे धोरण ताबडतोब रद्द करून बौध्द आणि अनुसूचीत जातीच्या लोकसंख्या एकत्रित करून लोकसभा आणि विधानसभेच्या राखीव जागा नव्याने निश्चित कराव्यात 9) भ्रष्टाचार मुक्त शासन आणि त्यासाठी शिष्यवृत्ती फ्रिशीपची अनुसूचीत जाती, जमाती व अल्पसंख्यांक योजना आॅनलाईन करण्याचे धोरण हे शिष्यवृत्ती बंद करण्यासाठीची प्रणाली ठरली आहे. यावर शासनाने पुनर्विचार करावा. विदयाथ्र्याची शिष्यवृत्ती विदयाथ्र्याच्या बॅंक खात्यात आणि शिकवणी फी ची रक्कम संस्थेच्या खात्यात जमा करावी व ज्या संस्था विदयाथ्र्यांकडून शिकवणी फी वसुल करतात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. 10) बुध्दगया येथील महाबोधी महाविहार संपुर्ण आखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात दयावे. 11) बौध्द धर्मियांनी स्थापन केलेल्या शाळा, महाविदयालयांना त्याच्या साधने व डिजिटल सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय विभागाने किमान 25 कोटी रूपये अनुदान दयावे. 12) हिंदूचे पवित्र श्रध्दास्थान पंढरपुर, शिर्डी, दत्तमंदिर गांणगापुर, स्वामी समर्थ आक्कलकोट, तुळजा भवानी तुलजापूर, शनिशिंगणापूर व त्रिंबकेश्वर नाशिक येथील कुंभमेळा, मुस्लिमांच्या हज यात्रेसाठी अनुदान व हिंदूच्या इतर पवित्र ठिकाणी भाविकांना नागरी सुविधा व आरोग्यासाठी हजारो कोटी रूपये सरकार खर्च करते तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपÚयात आयोजित करण्यात येत असलेल्या बौध्द धम्म परिषदेमध्ये नागरी सुविधा तसेच चैत्यभूमी, चवदार तळे, काळाराम मंदिर आणि दिक्षाभूमी नागपूर येथे सरकारने भरीव आणि आवश्यक नागरी सुविधांसाठी आर्थिक तरतुद करावी. 13) भारतीय संविधानाचा सर्व स्तरावर सर्व शाखेच्या अभ्यासक्रमात अंतर्भुत करावे 14) सर्व धर्मीय, सर्व जातीय विदयाथ्र्यांना एकाच प्रकारची शाळा व अभ्यासक्रम लागु करावा. इंग्रजी अथवा मराठी माध्यम आणि वेगवेगळे बोर्ड आणि असमान सुविधा, साधने व असमान शिक्षक वेतनश्रेणी ही राष्ट्रीय एकात्मता आणि एकतेला धोका असून या पध्दतीचा पुनर्विचार व्हावा 15) कान्हेरी लेणी, बोरीवली पुर्व, मुंबई येथे भिक्खू संघाच्यावतीने 2020 मध्ये येणाÚया महाशिवरात्री दिवशी बौध्द धम्म परिषद घेण्याचा निर्णय झाला. पुज्य भदंत शांतीरत्न यांनी समारोपाच्या सत्रात दिवसभरातील चर्चा आणि प्रवचनाअंती एकमताने प्रस्तावित झालेले 15 ठराव मांडले त्यावर धम्म परिषदेत एकमताने ठराव पारीत झाले. धम्म परिषदेमध्ये परिश्रम घेणारे उपासक, उपासिका आणि विशेषतः पुज्य भन्ते शांतीरत्न यांनी गेली एक महिना परिषदेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली त्याबद्दल उपासकानी आभार मानुन राष्ट्रगीताने धम्म परिषदेची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top