0
 भोर :  प्रतिनिधी smsnews -महाड रोडवर आंबेघर गावाजवळ रस्त्यात महिलेला थांबवून लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणा-या अट्टल टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग करत चार अट्टल दरोडे खोरांना भोर पोलिसांनी अटक केली. या गुन्हात एका महिलेसह तीन तरुण असुन एक जण फरार झाला. आरोपींनकडुन एक कार,  एक मोटर सायकल यांच्यासह   दोन कोयते, एअर गन, मिरची पावडर,  पाच मोबाईल असा एकुण १ लाख ९१ हजाराचा एैवज जप्त केला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता घडली.   अक्षय महेंद्र यादव (वय १९ रा आंबेघर ता.भोर), विक्रम विजय शिंदे (वय १९, पिंपळेगुरव पुणे, संदीप आनंदा हिरगुडे (वय ३१ रा हर्णस ता.भोर), दिपीका आनंद शिळीमकर (वय २४, रा मोहननगर धनकवडी पुणे) यांना अटक करण्यात आली असून पाचवा आरोपी  फरार झाला आहे. त्याचे नाव कळू शकले नाही. आरोपींकडून एक दुचाकी आणि एम मोटार कार पोलिसांनी जप्त केली आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

 
Top