0


ठाणे,SMS News प्रतिनिधी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनायावर्षी दिवाळीचे सानुग्रह अनुदान म्हणून 15 हजार ५०० बोनस जाहीर करण्यात आला. यावर्षी ४०० रुपयांनी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. इतर कोणत्याही महापालिकेने अनुदानामध्येवाढ केली नसून केवळ ठाणे महापालिकेने चारशे रुपयांनी वाढ केली माहितीम्युन्सिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी दिली. कंत्राटी कामगारांना बोनस म्हणून अतिरिक्त एक महिन्याच्या पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सानुग्रह अनुदानामुळे ठाणे महापालिकेवर तब्बल १२ कोटी ८३ लाख ९ हजार रुपयांचा बोजा पडणार आहे.

महापालिकेत आतपर्यंत हा सर्वांत जास्त बोनस असल्याचे म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायस्वरूपीकर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्याअडीज हजारांच्या घरात आहे.त्यामुळे दिवाळीच्या बोनसची रक्कम आधीच जाहीर झाल्यानेकर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र गोड होणार आहे.

ठाणे पालिकेकच्या विविध विभागातस्थायी, अस्थायी, ठोक पगारावरील कर्मचारी, अनुकंपा वारसा कर्मचारी अशा ८ हजारकर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा निर्णय शुक्रवारीपालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युनिसिपल लेबर युनियन अध्यक्ष रवी राव यांच्या बैठकीत घेण्यात आला.मागीलवर्षी झालेल्या वाटाघाटीत पालिका कर्मचाऱ्यांना१५ हजार १०० रुपयेबोनस देण्यात आला होता.

गेल्या वर्षी पालिकेच्या उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळेकर्मचाऱ्यांना २०हजाराचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी गेल्या वर्षीम्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव यांनी केली होती. मात्र, २० हजार बोनस देण्याची मागणी मान्य न करता कायस्वरूपी कामगारांना १५ हजार १०० तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्ह्णून देण्यात येणार आला. यावर्षी मात्र बोनसमध्ये ४०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तरकंत्राटी कामगारांनी एका महिन्यात जेवढी हजेरी लावली आहे तेवढा एका महिन्याचा बोनस म्हणून देण्यात येणार आहे.

ठाणे महानगर पालिकेत कायस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या५ हजार ८३ एवढी आहे. अनुकंपा वारसा तत्वावरील कर्मचारी २ हजार ५८ ठामपा ठोक पगारावरील कर्मचारी २५२, शिक्षण विभागातील कर्मचारी १ हजार ५१,शिक्षण विभगातीलठोक पगारावर कर्मचारी २३असे एकूण 8 हजार २७८ कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिका कामगार कर्मचार्यांना मागील तीनआर्थिक वर्षात अदा करण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानात सन २०१४ -१५ मध्ये १२ हजार ५०० ,सन २०१५-१६ मध्ये १३ हजार २५० , सन २०१६ -१७ मध्ये १४ हजारसन २०१७-१८ मध्ये १५ हजार १०० तर सन २०१८-१९ मध्ये १५ हजार ५००सानुग्रह अनुदान देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top