ठाणे प्रतिनिधी 20 सप्टेंबर : ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊद आणि छोटा शकील च्या नावाने धमकवणाऱ्या युवकाला ठाणे खंडणी विरोधी पथकाने ( गुन्हे शाखेने ) अटक केलीय. वसीम मुल्ला (वय-28) असं धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव असून तो मुंब्रा परिसरात राहणारा आहे. इंटरनेट वरून नगरसेवकांचं नाव आणि नंबर काढून हा युवक धमकी देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत त्याने पाच नगरसेवक आणि पोलिसांना धमकी दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. मुंब्रा परिसरात राहणारी महिला तरनुम कुरेशी यांचा मोबाईल त्यांच्या मोलकरणीने काही महिन्यांपूर्वी चोरला होता. अकबरअली डावरी असे मोलकरणीचे नाव असून या मोलकरणीनेच हा मोबाईल या युवकाला विकला होता.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

टिप्पणी पोस्ट करा