बुलडाणा,प्रतिनिधी दि. 26/09/2019 रोजी दुपार नंतर बुलडाणा,चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस बरसला त्यामुळे पैनगंगा नदीत मोठा पुर आला.या पाण्याची आवक लक्षात घेत पेनटाकळी प्रकल्पा मधून नदीपात्रात 6742 क्यूसेकं एवढा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती लक्षात घेता. आज दि. 26/09/2019 रोजी रात्री 0.15 वाजता कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बुलडाणा श्री. कन्ना, उ.वि.अ.पाटबंधारे विभाग श्री रोकडे, शाखा अभियंता चिखली श्री राजपूत यांनी पेनटाकळी प्रकल्पस्थळी भेट दिली.सदर प्रसंगी, श्री चौगुले उ.वि.अ. पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, मेहकर, श्री वचकल कनिष्ठ अभियंता, श्री. पिठे कनिष्ठ अभियंता, व पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभागाचे इतर कर्मचारी उपस्थित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा