0

 सांगली,प्रतिनिधी मागील 2-3 दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे महासचिव मा गोपीचंद पडळकर साहेब हे भाजपमध्ये स्वगृही परतणार अशा बातम्यांना ऊत आलेला आहे, परंतु पडळकर साहेब हे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे एक जबाबदार पदाधीकारी आहेत, ते वंचित आघाडीतच राहणार आहेत आणि आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित फॅक्टर हा येत्या विधानसभा निवडणुकीत प्रभावी ठरणार असल्याने वंचित घटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठीच प्रस्थापित व्यवस्थेकडून अशा बातम्या पेरल्या जात असून माझी तमाम वंचित आघाडीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना विनंती आहे कि या अफवांवर विश्वास न ठेवता आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवावे.
  गोपीचंद पडळकर हे समाज हितासाठी तसेच बहुजन कल्याणासाठी अहोरात्र झटणारे,  सामाजिक चळवळीमध्ये प्रचंड मेहनतीने काम करणारे प्रामाणिक नेते आहेत, धनगर समाजाला आरक्षण देतो असे आश्वासन देऊन भाजपने 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील धनगर समाजाचे तमाम 1.75 कोटी मतदान आपल्या पदरात पाडून घेतले होते, तब्बल 4 वर्षे पूर्ण होऊन देखील भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही म्हणून गोपीचंद पडळकर यांनी भाजप ला लाथ मारून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत तब्बल 3 लाखापेक्षा जास्त मतदान घेतले आहे याच गोष्टीला इथली प्रस्थापित व्यवस्था घाबरली आहे त्यामुळेच या बातम्या मुद्दाम पेरल्या जात आहेत.
   या प्रसंगी एक आठवण करू द्यावीशी वाटते कि मागील वर्षी भाजपला रामराम करताना गोपीचंद पडळकर साहेबांनी आरेवाडीत बिरोबाच्या बनात दसरा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता आणि साहेबांनी स्वतः शपथ घेत समस्त लाखो जनसमुदायाला जी बिरोबाच्या साक्षीने शपथ दिली होती तो व्हिडीओ पाहता आपल्या लक्षात येईल कि गोपीचंद पडळकर साहेब भारतीय जनता पार्टी मध्ये निश्चित जाणारच नाहीत.
राजेश गायगवाळे
युवक आघाडी
वंचित बहुजन आघाडी
सांगली जिल्हा
9595354545
मा. गोपीचंद पडळकर साहेबांनी आरेवाडीच्या बनात घेतलेली शपथ

टिप्पणी पोस्ट करा

 
Top