अंजनगाव सूर्जी प्रातिनिधि. जयेंद्र गाडगे ता शहरातील काही निर्जन स्थळे व काही चाट व फास्ट फूड सेंटर काॕलेज मधील विद्यार्थी विद्यार्थ्यांना एकांत sms news मिळवून देण्याचे ठिकाणं बनली असल्याने दुकान मालकांच्या संमतीने तेथे अनैतीक कामे सुद्धा होण्याचे प्रकार वाढले असून याकडे पोलीस विभागाने लक्ष देण्याची मागणी होत असून पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या वर्तणुकीबाबत सतर्क होण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे
********* शहरातील नविनबसस्थानक ते टाकरखेडा नाका या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फास्टफूड सेंटर लागले असून महाविद्यालयीन तरुण तरुणी या दुकानात ग्राहक म्हणून तासंतास बसतात काही दुकानांमध्ये स्वतंत्र कॅबिन सुद्धा उपलब्ध असून एकांतवास मिळवण्याचे ठिकाण बनले आहे काही सजग पालकांनी या फूडसेंटरवर प्रशासनाने पाळत ठेवावी म्हणून बरेच दिवसापासून मागणी सुद्धा केली आहे.गुरुवारी (ता.०५) ला एका अल्पवयीन तरुणी आपल्या प्रियकरासोबत एका चायनीज सेंटरमध्ये बसले असल्याचे पालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी गावातील काही तरुणाकरवी त्या युवकाची चांगली पीटाई करुण पोलीस स्टेशनला नेले.मूलगा आणि मूलगी दोघेही वेगवेळ्या धर्मांचे असल्याने शहरात अफवांचा बाजार गरम झाला मोठा जमाव पोलीसस्टेशन जवळ जमा झाला ज्यात एका गटाने काही मूलाना मारहानही केली.ज्यामूळे शहरात काही वेळ तणाव सदृष्य परिस्थीती निर्माण झाली होती.परंतू रात्री ऊशीरापर्यंत कोणत्याही पक्षाने पोलीसात तक्रार दाखल केली नसल्याने तणाव निवळला असला तरी गणेशोत्सव आणि पूढे येणारा सण उत्सवाचा काळ पहाता हा वाद पून्हा ऊफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने शहरात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी असलेले गर्दीच्या स्थळावर पोलीसांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागारीकातून होत आह
गुरुवारी (ता.०५) घडलेल्या एका प्रकरणात फीर्यादी शहारुख शहा सलीम शहा यानी दिलेल्या फिर्यादीवरुन , सरोदे अधीक २ याच्या विरुध्द २९४,५०४,५०६ ,३२३भादवीनूसार गून्हा दाखल करण्यात आहे तर एका जमावाने विनाकारण मारहाण केल्या प्रकरणी फीर्यांदी सूशांत देशमूख यानी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी फारुख शहा अधिक २ जणाविरुध्द ३२४,५०४,५०६ भादवी नूसार गून्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा