अंजगावात दुर्मिळ कदंबाच्या एकमेव आयुर्वेदिक झाडाचा शोध
****************************************************
आयुर्वेदामध्ये ह्या झाडाला फार मोठे महत्त्व आहे अध्यात्मामध्ये श्रीकृष्णाचे झाड म्हणून ह्या झाडाची नोंद
(झाडाचे फोटो सोबत आहेत )
अंजनगाव सुर्जी, जयेंद्र गाडगे
आयुर्वेदामध्ये कदंबाचे ह्या झाडाला फार मोठे महत्व असून कदंबाचे हे झाड औषधीय झाड म्हणून प्रसिद्ध आहे भगवान श्रीकृष्ण ह्या झाडा खाली बसून आपली बासरी वाजवत अशी आख्यायिका असून त्यांचे नावाशी हे झाड जुळले आहे
ह्या झाडाला मराठीत कदम, हिंदीत कदंब, संस्कृत मध्ये हरिप्रिय, गुजरातीमध्ये कदमबां, अडूसी अशी वेगवेगळी नावे ह्या झाडाला आहेत
सध्या भारतात कदंबाच्या अनेक प्रजाती असून ह्या मध्ये राज, भूमी, हंस, धारा, धुळी, अश्या विविध जातीने ह्या झाडाची ओळख आहे भगवान श्रीकृष्ण ह्या झाडाखाली बासरी वाजवत त्या मुळे ह्या झाडाला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे असे हे दुर्मिळ झाड इंदोर येथील संदीपनी ऋषि ह्यांचे आश्रमात असून ह्या झाडाखाली बसूनच संदीपनी ऋषी आपली तपश्चर्या करीत होते अशी अख्यिका आहे
कदंबाचे झाड हे शरीरातील विविध रोगांसाठी लाभकारी असून ह्या झाडाचा एकल जडी, बुटी,मिश्रीत औषधीय म्हणूनं अनुसंधान व रीसर्च सुरू आहे हे झाड जहर शामक झाड असून ह्या झाडाचे सालीचा गरम पाण्यात काढा तयार करून घेतल्यास पोटातील सर्व जीव जंतूंचा नाश होतो तसेच शरीरावर घाव , किंवा जखम झाल्यास अंगावर घाज, दाद, खूजली ,पीपल ,असल्यास ह्या झाडाची साल गरम पाण्यात उकडून जखम धुवून घेतल्यास व तोंडा मध्ये फोड आल्यास पाला तोंडात चावल्यास तोंड बरे होते, ह्या झाडाचे फळ हे फार मोठे पौष्टिक आहे ह्या फळाची वाळवून भुकटी खाल्यास ताकद, शक्ती वाढते तसेच शरीरातील दुर्बलता , कमजोरी , धातू रोग,नष्ट होतो, तसेच गरोदर मातासाठी शतावरी व कदंबाचे फळ ह्यांची बारीक भुकटी गरोदर मातेने पोटात घेतल्यास बाळाला चांगले दूध मिळते तसेच सर्दी ताप, मूत्रविकार, मलेरिया, शुगर, तसेच शरीरातील टॉक्सिक हे पूर्ण पने नष्ट करते
त्या मुळेच कदंबाचे झाडाला आयुर्वेदात फार मोठे स्थान आहे सदरचे झाड हे दुर्मिळ असून गेली कित्येक दिवसापासून हे झाड असल्याचे ज्ञात नव्हते परंतु वृक्ष प्रेमी कमलकांत लांडोळे , मनोहर मुरकुटे, भुपेंद्रजी भेलांडे, निलेश ईखार, बंदुभाऊं हंतोडकर, कृष्णा गोमासे ह्यांनी ह्या झाडाचा शोध लावला ,सदरच्या झाडाबाबत सर्वत्र चर्चा होत आहे


टिप्पणी पोस्ट करा