0

बलराम गणेश मंडळाचा आगळा वेगळा उपक्रम. रक्तदान शिबिराने केला गणेश उत्सव साजरा . ता.प्र.जयेंद्र गाडगे ८ऑगस्ट अंजनगाव सुर्जी      स्थानिक काठीपुरा येथे बलराम गणेश मंडळा तर्फे दरवर्षीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संकल्प केला जातो. गणेश मंडळातर्फे    दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले, मागील वर्षीच्या रक्तदान शिबिराला मिळणारा प्रतिसाद पाहता यावर्षी शिबिरात रक्तत्यांचा संख्येत वाढझाली असून ह्या वर्षी सुद्धा आतापर्यंत 70 रक्तदात्यांनी 70 बॉटल शिबिराच्या माध्यमातून रक्तदान केले.गणपती मंडळा मार्फत रक्तदान शिबिर सारखे सामाजिक कार्यक्रम राबवणारे तालुक्यातील एकमेव मंडळ म्हणून जनतेने दिलेले प्रशस्तीपत्र व जनतेने दिलेल्या प्रतिसादच खऱ्या अर्थाने आमचा उत्साह वाढवतो. असे मत यावेळी कार्यक्रमाचे आयोजक ,मंडळाचे अध्यक्ष सचिनभाऊ जायदे यांनी व्यक्त केली शिबिरा करिता डॉक्टर सदानंदजी बर्मा परतवाडा येथील चमुचे मार्गदर्शन लाभले शिबिराच्या माध्यमातून रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना या समयी भेटवस्तू व प्रशस्तीपत्रा चे वाटप केले गेले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता नगरसेवक तथा मंडळाचे अध्यक्ष सचिनभाऊ जायदे ,गौरव जायदे, दर्शन बर्हानपुरे,गजानन बारड,उमेश लावणकर, रोहित पटेल,निलेश गिरी,रोशन सातरोटे,वैभव शिंदीजामेकर भूषण बारड निखिल गुहे आनंद खलोकार अवि खलोकार शुभम पांढरे तुषार बारड इत्यादी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top