भिवंडी दि.2 फेब्रुवारी (प्रतिनिधी ) आपल्या देशातील सर्वच जाती समूह सत्तेकडे झेप घेतील त्याचवेळी भारतात खरी लोकशाही उदयास येईल आणि घटनाकारांचे स्वप्न साकार होईल असे मत लोक जनशक्ती पार्टीचे ठाणेजिल्हा अध्यक्ष जेष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर यांनी कार्यकर्ता शिबीरात मांडले
लोकजनशक्ती पार्टी भिवंडी तालुका आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिवंडी तालुका अध्यक्ष सुभाष धिवार होते यावेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार बिर्हाडे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम शिनगारे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नरेश शेळके, ठाणे शहर लोजपा युवा नेते सिद्धांत चासकर, समाजसेवकओहाळ साहेब यांनी पक्षकार्याबाबतचे विचार मांडले
भिवंडी येथील महात्मा फुले नगर नं. दोन म्हस्के टॅरेस येथे हे शिबीर आज सायं. सात वाजता संपन्न झाले लोकशाहीर अशोक कांबळे यांच्या ज्वलंत शाहिरीने शिबीराची सुरुवात झाली.
सर्व समाज समुहाचे प्रश्न सोडविण्यासाठी ना. रामविलासजी पासवान साहेब यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टी देशात वचनबद्ध आहे, देशात संविधान बदलाची आवई उठवली जात आहे परंतू दिल्लीतल्या सत्तेत ना. रामविलास पासवान आणि ना. रामदासआठवले हे दोन आंबेडकरी शेर बसलेले असताना काय हिम्मत कोणाची घटनेला हात घालायची असे परखड विचार चासकर यांनी पूढे बोलताना मांडले, भिवंडीच्या सरदार कंपाऊंड येथील गायत्री नगरातील झोपडय़ांचे आगीत झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई येथील नागरिकांना शासनाकडून मिळाली पाहिजे अशी मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा