0
 
अंजनगाव प्रतिनिधी SMS News स्थानिक स्व .दिगंबराव पेटकर आदिवासी आश्रम शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानिक शाळेचे अधिक्षक अमोल हाडोळे व प्रमुख अतिथि सौ.प्रचिती रसे .मुकेश वानरे हे प्रामुख्याने मंचावर उपस्थीत होते सर्व प्रथम महामानवांच्या फोटोचे मान्यवरांच्या हस्ते पुजन व हार अर्पण करण्यात आले फुल गुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयेंद्र गाडगे यांनी केले या वेळी अध्यक्षीय भाषनातुन हाडोळे म्हणाले जगातील तमाम मानव जातीचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती ,गावोगावी आज जयंती साजरी होईल .कोण्या धर्माच्या ,समुदायाच्या विरोधात,शिवराय नव्हते.तर अठरा पगड जातीला एकत्र करुन" मावळा "या शब्दात बांधला महीलांना अधिकारी दिले,युवराज शंभुराजेना १६ भाषेचे ज्ञान दिले ,भोसलेशाही निर्माण न करता रयतेचे राज्य निर्माण केले,शेतकऱ्यांचे व कष्टकऱ्यांसाठी बळीराज्य निर्माण केले.ते शिवाजी प्रत्येकाला समजावे . व त्यांचे विचार अंगीकारावे असे भावपुर्ण उदगार काढले शेवटी विध्यार्धानां स्वरूची भोजन देउन कार्यक्रमाची सांगता समारोपन करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

 
Top