अमरावती अंजनगाव प्रतिनिधी जयेंद्र गाडगे धनेगाव गाव येथे नुकतेच बजरंग युवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य व्याख्यानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदहू कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि मा आमदार संजय बंड व्याख्याते धनजय बोबडे
बंडू पाटील येवले विनोद हागोणे . सोपाण साबळे. जयेंद्र गाडगे श्री गायगोले सरपंच सुनिल राउत तलाठी विकास येवले . माधवराव येवले .प्रदिप येवले .आणि ल येवले अजय येवले श्री मेंढे उपसरपंच अंगतराव येवले हे प्रामुख्याने मंचावर उपस्थीत होते या वेळी अध्यक्षीय भाषनातून संजय बंड म्हणाले खरा इतिहास जनतेसमोर मांडायला धाडस पाहीजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास येवले व सुत्रसंचालण .आभार प्रदर्शण सुनिल येवले यांणी केले तर श्री बोबडे यांनी आपल्या शब्दशैलीत व्याख्यान करित असतांना 20 फेब्रुवारी, 1707.....महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस ! याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणवून घेणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाचा महाराष्ट्रात 89व्या वर्षी मृत्यु झाला! तब्बल 25 वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छातीझुंज घेऊन एक आदर्श निर्माण केला. आपल्या सर्वस्वाची या लढयात अक्षरशः राखरांगोळी झाली, आपला एक छत्रपति, आपली राजधानीही आपण गमावली, कित्येक लोकांनी फितुरी केली पण आपलं राज्य, आपलं स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही. औरंगजेब दख्खनेत उतरला तोच स्वराज्य गिळंकृत करायला पण या मातीतल्या शिवरायांचे शिष्य असलेल्या शुरांनी सर्व शक्तिनिशि त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरवू अशा भ्रमात असलेल्या औरंगझेबास गलितगात्र व्हावे लागले. ठार अपयशाची भळभळती जखम ऊरात वागवतच त्याने डोळे मिटले. कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अक्राळविक्राळ शक्तिपुढे टिचभर असलेले, थोरल्या महाराजांचे हिन्दवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले.
मुघल बादशहा म्हणून औरंगजेबाची एकुण कारकीर्द जवळपास 50 वर्षांची. त्यातील शेवटची 25 वर्षे तो प्रचंड सैन्यासह दख्खनमधे होता, या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले. 1682-89 संभाजी राजे, 1689-1700 छत्रपती राजाराम, संताजी-धनाजी आदी वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात 1700-1707 महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याविरूद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले.
शिवाजीराजांच्या जन्माच्याही 140 वर्षे आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले मात्र स्वराज्य धक्के खात खात का होईना पण, शेवटी अजिंक्यच राहिले.
स्वतः ला शुक्रवारी म्रुत्यु यावा अशी औरंगजेबाची इच्छा होती. हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले. 20 फेब्रुवारी 1707 (ज्युलियन केलेंडर प्रमाणे) या शुक्रवारच्याच दिवशी 'हजरत सलामत किब्ला ई दिनों दुनिया अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहंमद औरंगजेब शहेनशहा ई गाझी आलमगीर' असे पदवीनिशी भलेमोठे नाव आणि भलेमोठे आयुष्य व कारकीर्द लाभलेला हा सहावा मुघल बादशहा नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला. मात्र , त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुदलाबादला, त्याचा गुरू शेख झैनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले. अतिशय साधेपणाने असलेल्या या कबरीसाठी , औरंगजेबानेच हयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासुन मिळालेले 14 रूपये 12 आणे वापरण्यात आले.
औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथुन दिल्ली कडे पोबारा केला. त्याच्या उरलेल्या 3 मुलांमधे सत्तेसाठी यादवी युद्ध झाले.
इथुनच मुघल सत्तेच्या र्हासाला सुरुवात झाली.
रक्त मासांचं शिंपण करून मुघलांविरुद्ध लढलेल्या सर्व विरांना त्रिवार मुजरा करुण शब्दांना पुर्ण विराम दिला

टिप्पणी पोस्ट करा