0


सांगोला / प्रतिनिधी                                                     

रिप‍ब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री

ना.रामदासजी आठवले आज शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सांगोला तालुका दौऱ्यावर येत असून सायंकाळी ५ वाजता जुनोनी (ता.सांगोला) येथे त्यांचे जंगी स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, आर.पी.आय.च्या पदाधिकाऱ्यांनी जुनोनी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन आर.पी.आय. चे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी केले आहे.

आज शनिवारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदासजी आठवले हे सांगली येथून सांगोला मार्गे पंढरपूर येथील कार्यक्रमास जाणार आहेत. यामध्ये सांगोला येथील पदाधिकाऱ्यांची ते धावती भेट घेणार आहेत. त्यानिमीत्ताने सांगोला आर.पी.आय.च्या वतीने जुनोनी (ता.सांगोला) येथे त्यांचा सत्कार केला जाणार असून तालुक्यातील आर.पी.आय. च्या पदाधिकाऱ्यांनी जुनोनी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन आर.पी.आय. चे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top