0

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर त्यांना अमोल यादवचं कर्तृत्व बघून प्रचंड आनंद झाला असता. भारताच्या Aircraft Manufacturing sector मध्ये कॅ.अमोल यादव यांनी नवा ईतिहास घडवला आहे.

कॅ. अमोल यादव वयाच्या १८ वर्षी Commercial Pilotचे प्रशिक्षण घ्यायला अमेरिकेला गेले होते, त्यांचे मूळ गाव सातारा असून सध्या ते मुंबई मध्ये राहतात, त्यांचे वडील Bank Manager असून ते आंबेडकरी चळवळीत सक्रीय आहेत.
सन. १९९५ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी अमेरिकेत शिकत असतांना एका Exhibition मध्ये त्यांना एक जुनं विमान दिसलं जे विक्रीला होतं, त्यांनी सहकार्यांना एकत्रित करून ते विमान विकत घेतलं.  या विमानाची देखरेख करतांनाच त्यांना विमानाची बनावट आणि त्यातील बारीकसारीक बाबी कळायला लागल्या, इथूनच त्यांची विमान बनविण्यामध्ये रुची वाढायला लागली आणि त्यांनी मुंबईला आल्यावर स्वतः विमान बनविण्याचा निर्णय घेतला.
साधारतः विमान बनविण्यासाठी Aeronautical Engineering हि skill लागते पण अमोल यादव हे इंजिनियर नसून ते commercial pilot आहेत मात्र या विषयातील प्रंचंड आवड त्यांना हे काम करण्यासाठी प्रेरक ठरते.
Twin Engine Turboprop Aircraft अश्या प्रकारातील विमान उडविण्यामध्ये ते पारंगत आहेत.
मुंबईत आल्यावर अमोल यादव यांनी विमान बनवायला सुरुवात केली, अडचणींचा खूप मोठा डोंगर त्यांच्या पुढे होता मात्र त्यांनी परिणामांची पर्वा न करता कामाला सुरुवात केली.
'कांदिवली' तील चारकोप येथे पाच मजली ईमारती मध्ये ते संयुक्त कुटुंबात राहतात, घरात एकूण १९ सदस्य आहेत.

विमान बनविण्याकरिता जागेची मुख्य अडचण होती, त्याकरिता त्यांनी राहत असलेल्या इमारतीची गच्ची निवडली, ईमारतीला लिफ्ट नसल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता.

१८० किलोचे इंजिन, वेल्डिंग मशीन मोठ्या प्रयासाने टेरेस वर नेले आणि कामाला सुरुवात झाली, हि जागा सुद्धा फार काही मोठी नव्हती, टेरेसवर ताडपत्रीचा शेड तयार केला, त्यात प्रचंड गर्मी आणि पाऊस अश्या वातावरणात काम चालू होते.

अमोल यादव यांच्याबरोबर एक ऑटोमोबाईल गैरेज Mechanic आणि एक वेल्डर अशी टीम होती. चुकांमधून शिकत, गुणवत्तेच्या आग्रहाखातर ८ वर्षाच्या खडतर प्रयत्नांना यश आले आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये ६ आसनांची क्षमता असणारे विमान बनून तयार झाले.


संपूर्णपणे घरामध्ये बनलेलं भारतातील पाहिलं विमान बनून तयार झालं, यातील इंजिन इतके Powerful आहे कि जमिनीपासून १३००० फिट (३९२४ मीटर) उंच उडू शकत, याची Oil Capacity २००० किमी. प्रवास करता येईल एवढी आहे. त्याचबरोबर एका तासात हे विमान ३४२ किमी. अंतर पार करू शकते.       
विमान बनून झाले होते पण खर्या अडचणींना येथून सुरुवात झाली, मुंबईतील 'Make-In-India' कार्यक्रमामध्ये हे विमान ठेवावं असं अमोल यादव यांना वाटत होत मात्र आयोजकांनी जागेची कमतरता आहे हे कारण दाखवत परवानगी नाकारली. पण अमोल यादव यांचे बंधू यांनी धीर न सोडता त्याच कार्यक्रमात जागा मिळवली.

परंतु चारकोप येथील घराच्या गच्चीवरून BKC बांद्रा ला विमान घेवून जाणे हा मोठा टास्क त्यांच्यापुढे होता. संपूर्ण विमानाचे भाग वेगळे करून त्यानंतर इलेक्ट्रिक क्रेन च्या मदतीने महत प्रयासाने दोन ट्रक मध्ये ते विमान BKC ला नेण्यात आले, इथून हे विमान लोकांच्या नजरेत आले आणि देशभरात त्याची चर्चा व्हायला लागली.
घराच्या गच्चीवरून काढलेले विमान परत गच्चीवर नेता आलेच नाही,  जवळपास १५ महिने ते विमान बाजूच्या मंदिरात उभं होत. त्यानंतर एका Air Show मध्ये घेवून जाण्यात आलं आणि मुंबई विमानतळावर कंटेनर ट्रक मध्ये ते उभं राहिलं.
DGCA च्या अधिकाऱ्यांनी मात्र अमोल यादव यांना ६ वर्षापर्यंत रजिस्ट्रेशन दिलं नाही, विमान हवेत उडण्यासाठीच Certificate सुद्धा दिलं नाही, यादव यांना जाचक ठरतील असे नवनवीन नियम ते वेळोवेळी बनवत होते.   
मागील ८ वर्षाच्या कालावधीत विमान बनविण्याकरिता अमोल यादव यांना जवळपास ५ करोड एवढा खर्च आला आहे, त्याकरिता त्यांना आईचे दागिने सुद्धा कामात घ्यावे लागले. अमोल यादव याचं निरीक्षण आहे कि 'भारतात सामान्य लोकं जे नवनवीन शोध लावतात त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही'.
बांद्रा येथे पार पडलेल्या 'Magnetic Maharastra' या संकल्पनेतील 'Global Investors Summit' मध्ये महाराष्ट्र शासनाने कॅ.अमोल यादव यांच्या बरोबर 'Aircraft Manufacturing Company' स्थापन करण्यासाठी ३५,००० करोड रुपयांचा करार केला आहे.
कॅ. अमोल यादव आणि MIDC यांच्यात झालेल्या करारानुसार कंपनीसाठी पालघर येथे १५७ एकर जागा देण्यात आली असून, यातून १०,००० नवीन रोजगार निर्माण व्हावेत अशी व्यवस्था आहे.
अमोल यादव म्हणतात कि पुढील २ ते ३ वर्षात ६०० विमानं बनवायचं त्याचं ध्येय असेल पुढे ते वाढवून १३०० विमानांपर्यंत नेणार आहेत. या करिता ते 'Pret And Vhitani' या कंपनीकडून इंजिन घेणार आहेत.
भारत Aeronautics क्षेत्रात मागे असण्याचं कारण यादव सांगतात कि, या बाबतीत आपल्याकडे असलेली उदासीनता आणि स्वतःवरील अविश्वास. मागील ७० वर्षात आपण स्वतःच एकही विमान बनवलं नाही मात्र अमेरिका दिवसाला २६३ विमानं बनवायची ते सुद्धा ६० वर्ष अगोदर.
भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी HAL (Hindustan Aeronautics Limited) कडून अपेक्षित असते कि तिने विमानं बनवावीत पण कॅ. अमोल यादव म्हणतात कि सरकारी नोकरी करणारी मानसं कशी विमानं बनवणार त्या करिता ध्यास लागतो, विमानाचा शोध लावणारे राईट बंधू व्यवसायाने सायकल रिपेयर करायचे.
भारत सरकारच्या काही Authorities वर नाराजी व्यक्त करत ते सांगतात कि, 'Director General Of Civil Aviation' यांची जबाबदारी बनते कि या क्षेत्रातील लोकांना पाठबळ देणं मात्र ते या उलट काम करतात.
कॅ. अमोल यादव सांगतात कि त्यांच्या घरात आंबेडकरी चळवळीचे वातावरण आहे, ते स्वतःला 'भीमाचा बेटा' मानतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेवूनच ते कार्य करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top