0



मोर्शी :- प्रतिनिधी  क्रिकेट हा खेळ उत्साही असून युवकांना आनंद देणारा आहे, परंतु क्रिकेटमध्ये सर्व स्पर्धक जसे प्रेमाने खेळ खेळतात, तसेच वातावरण शहराचे निर्माण व्हावे यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.अनिल बोंडे यांनी मोर्शी येथे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.

यावेळी मोर्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी तळवी साहेब, न.प.मोर्शीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, गटनेता नितीन राऊत, जिल्हा परिषद सदस्य सारंग खोडस्कर, आरिफ पहेलवान, निसार पठाण, जगदीश जयस्वाल, फाईन मोटर्सचे संचालक बब्बूभाई, नगरसेवक दीपक नेवारे, नईम खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवी मेटकर, निलेश चौधरी, भूषण कोकाटे, अजीज पठाण यांच्यासह अन्य क्रिकेट प्रेमी व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top