0
शिर्डी प्रतिनिधी सत्य लेखणीचा अखेर विजय
हो मला सत्य आवडते म्हणून निर्भीडपणे भ्रस्ट वेक्ती आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार यावर निर्भीडपणे आपले मत मांडून बातम्या केल्या, अनेक वेळा धमक्या आल्या पण डगमगलो नाही कारण साईबाबांच्या झोळीत हात घालू नये आणि घालू देणारही नाही हा माझा संकल्प आहे.त्यातून कथित तूप घोटाळा बाहेर काढला त्यावर स्वतःचे मत मांडले बातमीरूपाने पाठपुरावा केला, याचे कारण म्हणजे मी साईभक्त प्रथम आणि नंतर शिर्डी ग्रामस्थ आणि पत्रकार आहे मात्र काहींना ही गोष्ट पचली नाही म्हणून विश्वस्थ भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सुपुत्राने माझ्या आईचा उध्दार घाणेरड्या शिवीगाळ करून केला मात्र आई आणि साई यांची शिकवण आणि संस्कार यांचा आदर करत कायदेशीर मार्ग अवलंबिला.माझ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक श्री वानखेडे साहेब, अलोने साहेब, जिल्हा अध्यक्ष  बाळासाहेब नावगिरे साहेब, भारत पवार, अनिल कोळसे, राजेंद्र बनकर, आणि सर्व तालुका अध्यक्ष  पदाधिकारी सर्व पत्रकार बांधव खास करून दै नायकचे तिवारी साहेब, नगर दर्शनचे मुख्य संपादक, जय बाबाचे मनोजभाऊ आगे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आज लेखणीचा विजय झाला आणि भ्रष्टाचाराचा पराजय.कारण मा.मुख्यमंत्री यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल मॅडम यांची तडकाफडकी बदली केली. पत्रकार धमकी प्रकरण संबंधित तूप घोटाळ्यात आल्याने विश्वस्थ भाऊसाहेब वाकचौरे हे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
साईंचा चमत्कार घडतो आणि घडत राहणार त्यासाठी फक्त हवी श्रद्धा आणि सबुरी जिचे पालन आपण सर्वांनी केले त्या मुळेच आज लेखणीचा खरा विजय झाला.माझी वयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही फक्त लढाई आहे ती भ्रष्ट्राचार आणि भ्रष्ट्र लोकांविरोधात त्या साठी जीव गेला तरी हरकत नाही कारण मी साईंच्या तिजोरीचा एक रक्षणकर्ता अर्थात सुरक्षा रक्षक आहे. लोक काही म्हणो मात्र प्रामाणिकपणा आणि मेहनत केली तर त्याला अपयश कधी येत नाही आणि असा माणूस कधी घाबरत नाही, आणि धमक्यांना भिकही घालत नाही.आज खऱ्या अर्थाने पत्रकार आणि त्यांच्या लेखणीची ताकद सर्वांना समजली असेच म्हणावे लागेल. कायदा खूप चांगला आहे पोलिसही त्याचा चांगला वापर करूनच अशा प्रकारच्या घटनेला आळा घालतील हा माझा विश्वास आहे.यापुढे ही असाच लढा आणि सच्चईचा बुलंद आवाज गर्जत राहणार हीच साई चरणी प्रार्थना.
पत्रकार राजेंद्र भुजबळ
जिल्हा अद्यक्ष,(इलेक्ट्रॉनिक मीडिया) महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ, शिर्डी

टिप्पणी पोस्ट करा

 
Top