अकोला,प्रतिनिधी
अमरावती विभागातील जिल्ह्यांच्या विकासासोबतच अकोल्यातील विमानतळाचा प्रश्न त्वरित निकाली काढून जमीन संपादन करून हवाई सेवा त्वरित सुरु करा तसेच मोर्णा नदीचा बारामतीच्या धर्तीवर सौन्दर्यीकारणासाठी दोन कोटी रुपये डी.पी.आर मंजूर करा व जिल्ह्याच्या विकास कामांना शासन व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गती द्यावी. जनता भाजपा शासनाकडे मोठ्या आशेने बघत असून शासनाने जिल्ह्यात अनेक योजना व विकास कामे सुरु केली आहेत त्यामुळे शासन अभिनंदनास पात्र आहे असे अमरावती विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वित्तमंत्री ना.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खा. संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल यांनी अनेक विषयांवर शासनाचे लक्ष वेधले.
आज अमरावती येथे अमरावती विभागीय आयुक्त यांचे कार्यालयात राज्याचे वित्तमंत्री ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार, ना. दीपक केसरकर यांचे उपस्थितीत अमरावती विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागातील लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत खा. संजय भाऊ धोत्रे यांनी अकोला येथील विमानतळाचा तसेच मोर्णा नदी सौन्दर्यीकरणाचा प्रश्न उपस्थित केला तर आ. गोवर्धन शर्मा यांनी क्रीडा व सांस्कृतिक भवनासाठी व शहरातील विकास कामांसाठी विशेष निधीची मांगी केली. आ. रणधीर सावरकर व आ. प्रकाश भारसाकळे यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत तसेच जिल्हा परिषदेच्या अकार्यक्षमतेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना होणारात्रास व त्यामुळे शासनाची होणारी बदनामी या बाबत प्रभावीपणे भूमिका मांडून अकोला शहराच्या विकासासाठी निधी तसेच बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालय, खारपान पट्ट्यातील सिंचनाचे प्रश्न उपस्थित केले. महापौर विजय अग्रवाल यांनी अकोला महानगर पालिकेच्या इमारती संबंधी प्रश्न उपस्थित करून शासनाने १० कोटी रुपयाचा निधी इमारत बांधकामासाठी शासनाने मंजूर केल्याचे सांगितले परंतु इमारतीची जागा तसेच निधी संबंधी संदर्भात भूमिका विषद केली. अकोल्याचे जिल्हाधिकारी अस्थिककुमार पांडे यांनी खा. संजय धोत्रे यांची संकल्पना साकार करण्यासाठी नमामि गंगेच्या धरतीवर मोर्णा नदीचे स्वच्छता अभियान लोकसहभागातून सुरु केला असून त्या प्रकल्पाला समाजातील सर्व स्थरातून पाठींबा मिळत असून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करून नागरोत्थान, दलित वस्ती व शहर विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी केली. जिल्ह्याच्या अनेक विकासाच्या बाबींवर तसेच पोलीस आयुक्तालय संदर्भात सुद्धा भाजपा लोकप्रतिनिधींनी शासनाकडे एकमुखाने मागणी करून पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वत्र विकास पर्व सुरु आहे त्याला गती द्यावी अशी मागणी खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे व महापौर विजय अग्रवाल यांनी केली. या वर वित्त व नियोजन मंत्री ना. सुधीर मूनगंटीवार यांनी हवाई पट्ट्यासाठी खाजगी जमीन संपादन अधिग्रहण संदर्भात सरकार सकारात्मक असून मोर्णा नदीच्या सौन्दर्यीकरणासाठी डी.पी.आर तसेच अकोला शहराची भविष्यातील ३० वर्षाची वाढती लोकसंख्येचा विचार करून डी.पी.आर योजनेसाठी भाजपा लोकप्रतिनिधींच्या मागणीला प्राथमिकता देऊ असे अभिवचन ना. सुधीर मूनगंटीवार यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा