💥 * काळगव्हाण येथील घटना💥 घरकुलं जागेचा वादातून, एकाच कुटुंबातील चार व्यक्तीनी अंगावर राॅकेल घेत घेतले पेटून.* अंजनगाव/17 (जयेंद्र गाडगे) अंजनगाव तालुक्यातील काळगव्हाण येथील निवासी शिल्पा विलास सदार( 45)यांना पंचायत समिती कडून घरकुल मंजुर झाले होते दि.17मे रोजी बांधकामा बाबत मोजणी सुरू असताना शेजारी राहणारे आई शशिकला वासुदेव कोरडे (65) बहिण नंदा दिपक देशमुख (45)कुलदिप विलास सदार (18) या कुटुंबात झालेल्या वाद विकोपाला गेल्याने या सर्व सदस्यांनी स्वताला जाळून घेतले या सर्व जख्मीना अमरावती येथे उपचार करिता भर्ती करण्यात आले यातील शिल्पा सदार, नंदा देशमुख, शशिकला कोरडे गंभीर जखमी आहे या घटनेमुळे काळगव्हाण गाव हादरून गेलें आहे चिचोंली रहिमापुर पोलिस तपास करित आहे..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा