लेख, मतांचा जोगवा ----------------
राजकिय पक्षांच्या विविध यात्रा आणि फार्स सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर सत्ताधारी . भाजपाची . महाजनादेश यात्रा शिवसेनेची जनआशिर्वाद यात्रा आणी राष्ट्रवादीची शिवराज्य यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यातील रोड शो द्वारा साद घालुन धुमाकुळ घालत आहे पण सर्वसामान्य माणुस म्हणुन माझ्या साहित प्रत्येक सुज्ञ नागरिकांना प्रश्न पडतो की नेमके निवडणूकीच्या तोंडावर मुद्दे नसलेल्या अशा राजकिय स्टंट करणाऱ्या यात्रा करण्यामागे राजकीय हेतु आणि उद्देश तरी काय उद्देश एकच जनतेच्या मतांचे धृवीकरण वोट बॅंकशाबुत ठेवणे महाराष्ट्रातील तमाम अप्रगत मागास दुर्बल बेरोजगार शेतकरी कष्टकऱ्यांना दिवसाढवळ्या मुर्ख बनवण्याचा हा मंत्र पूर्ण प्रयत्न आहे सध्या महाराष्ट्राचे शेतकरी आत्महत्या कर्जमाफी बेरोजगारी विदर्भ सिंचन अनुशेष नोकरभरती कालवे पुनरनियोजन आर्थिक मंदीची झळ वाढती महागाई सिंचनाचा प्रश्न महीला सक्षमीकरण आतंकवाद दारिद्ररेषेखालील व्यक तीचे पुनर्वसन व गड किल्यांचे संवर्धन उद्योगाप्रती नवनवीन प्रकल्प इत्यादी प्रश्नांची महाराष्ट्रात विशे शतः विदर्भात वणवा असतांना मात्र राजकिय पक्ष आपआपल्या यात्रांमधे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चिखलफेक करीत महाराष्ट्रातील समस्यांवर दुर्लक्ष करून जनतेला उल्लु बनवण्याचे काम करत आहे एका संस्थेने . केलेल्या सर्वेक्षणात शेतकरी आत्महत्या विदर्भात .सगळ्यात जास्त झाल्या शेतकऱ्यांना शेती करणेच न परवडणारे टास्क आहे त्यामुळे बळीराजा आत्महत्या करतो आहे परंतु ह्या कळ्कळीच्या मुदयांकडे आमच्या सत्ताधारीचे आजिबात लक्ष नाही कोणत्याही योजना पॅकेज शेतकऱ्यांच्या आत्महत्या नियंत्रित करण्यासाठी .सत्ताधाऱ्यांनी केल्या नाही विदर्भात बेरोजगारीचा प्रश्न आहे परंतु सत्ताधारि व जनप्रतिनीधी नी नवे उद्योग प्रकल्प आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही इथे सिचनाचा प्रश्न मागासवर्गीय आदीवासी योजनांचा दुष्कIळ आहे मेळघाट कुपोषणाने ग्रासला आहे व तेथील स्थानिक आरोग्य यंत्रणा स्वताच सलाईनवर आहे स्थानी क स्वराज्य योजना राबवता येत नाही विदर्भाचा 42.8% अनुशेष आजही शिल्लक आहे विदर्भाचा तरूण आज ही नोकरी व्यवसायासाठी बाहेर जातोय विदर्भात नविन प्रकल्पांना मान्यता मिळाली तर इथला तरुण स्वयंपुर्न होईल नुकत्याच कोल्हापूर सांगली कोकण तथा विदर्भाच्याच्या काही भागात झालेल्या महापूरामध्ये सत्ताधारी व विरोधक तथा तमाम महाराष्ट्राची आत्मीयता दिसुन आली परंतु महाराष्ट्र महापुरात अडकला असतांना काही भागात राजकीय यात्रा मात्र जोरात चालु होत्या बर या यात्रांसाठी चुराडा झालेल्या पैशांची उधळपट्टी ही सर्वसामान्याच्या पैशातुनच थोडक्यात काय तर पक्षाच्या या थोतांड यात्रा म्हणजे नुसता राजकीय स्टंट परंतु सुज्ञ जनतेनी अशा स्टंटला खतपाणी न घालता येत्या आगामी विधानसभेत त्यांना त्यांची खरी पात्रता दाखऊन देतील हे मात्र नक्की
--------------------------------------
सौ. स्मिताताई.ज्ञा. लहाणे .

टिप्पणी पोस्ट करा